पैशांपुढे नाते विसरले; अडीच लाखांसाठी आतेभावानेच काढला बहिणीचा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 12:41 IST2021-10-08T12:41:03+5:302021-10-08T12:41:23+5:30

Crime in Beed : आतेभावाने घेतलेले पैसे परत कराव्यात यासाठी बहिणीने तगादा लावला होता

Forget the relationship before money; For two and a half lakhs, the sister's killed by cousin brother | पैशांपुढे नाते विसरले; अडीच लाखांसाठी आतेभावानेच काढला बहिणीचा काटा

पैशांपुढे नाते विसरले; अडीच लाखांसाठी आतेभावानेच काढला बहिणीचा काटा

गेवराई : तालुक्यातील रांजणी येथे चार दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील महिलेचा सांगाडा सापडला होता. शवविच्छेदन अहवालात तिचा खून ( Murder in Beed ) केल्याचे तपासात समोर आले. या महिलेचा अडीच लाख रुपयांसाठी आतेभावानेच काटा काढल्याचे निष्पन्न झाले आहे.

राधा माणिक गायकवाड (३५, रा. इंदेवादी, ता.जि. जालना) असे त्या मयत महिलेचे नाव आहे. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तिचा सांगाडा रांजणी येथे महामार्गालगतच्या नाल्यात आढळला होता. या महिलेचा अनैतिक संबंधातून खूनच झाला असून तो तिच्या आत्याच्या मुलानेच केल्याचे तपासात समोर आले आहे. सामनगाव शिवारातून ती २१ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाली होती. तिच्या बहिणीने तालुका जालना ठाण्यात बेपत्ताची तक्रार नोंदवली होती.

सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी तपासाचे चक्रे फिरवून तिच्या खुनाचा उलगडा केला. मयत राधाचा भाऊ प्रकाश देवीदास दुनगहू (रा.इंदेवाडी) यांच्या तक्रारीवरून आतेभाऊ सुभाष बापूराव शेरे (रा. हरतखेडा ता.अंबड, जि. जालना) याच्यावर गेवराई ठाण्यात ६ ऑक्टोबर रोजी खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी फरार आहे. त्याच्या अटकेनंतर सर्व प्रकरणाचा उलगडा होईल, असे सपोनि संदीप काळे यांनी सांगितले.दरम्यान, मृत राधा यांच्याकडून सुभाष याने अडीज लाख रुपये घेतले होते. ते परत देण्यासाठी राधाने तगादा लावला होता. यातून हा खून झल्याचा अंदाज आहे. 

Web Title: Forget the relationship before money; For two and a half lakhs, the sister's killed by cousin brother