शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासात प्रथमच ८ महिने बंद राहिले परळीचे वैद्यनाथ मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:31 IST

परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २०२० मध्ये ८ महिने बंद ...

परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २०२० मध्ये ८ महिने बंद राहिले. मार्चपासून बंद राहिलेले मंदिर नोव्हेंबरमध्ये दिवाळी पाडव्याला उघडले. नोव्हेंबर पासून चेहऱ्यावर मास्क व हातावर सॅनिटासझर बंधनकारक करूनच मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जात आहे. मंदिरात दररोज स्वच्छता केली जात आहे. भाविकांची गर्दी सुरू झाली आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील साहित्य दुकान व हॉटेल पुन्हा गजबजले आहेत.

आठ महिने मंदिर बंद ठेवण्यात आल्याने येथे येणाऱ्या भाविकांना वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांचे दर्शन घेऊन समाधान मानले . श्रावणातही पायरी दर्शनावरच भाविकांना समाधान मानावे लागले.बंदच्या काळात मंदिर परिसरातील सर्व दुकानदारांना आर्थिक फटकाही बसला व मंदिराचे उत्पन्नही घटले . ही स्थिती कोरोनामुळे पहिल्यांदाच उद्भवली. नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या पाडव्याला वैजनाथ मंदिर सुरू झाले. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्र ,आंध्र ,कर्नाटक ,तेलंगणा, उत्तर प्रदेश व इतर राज्यातील भाविक प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनसाठी येऊ लागले आहेत..त्यामुळे मंदिर परिसर आता भाविकांच्या संख्येने फुलत आहे. मंदिर परिसरातील इतर व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागले आहेत. परंतु अभिषेक करण्यास, बिल्वपत्र वाहण्यास परवानगी अद्याप दिलेली नाही. त्यामुळे मंदिरात पुरोहितांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनादिकाळापासून परंपरागत पद्धतीने दसऱ्याच्या दिवशी होणारा सीमोल्लंघनचा सोहळा खंडित होऊ नये म्हणून दसऱ्याच्या दिवशी २५ ऑक्टोबर रोजी प्रभू वैद्यनाथाची पालखी मिरवणूक परिक्रमा शाही वाहनातून एकूण पाच मानकऱ्यांच्या उपस्थितीत अटींचे पालन करून परिक्रमा पूर्ण करण्यात आली. मंदिरात बंदच्या कालावधीत गुरव व वैजनाथ मंदिराचे पुरोहित हे नित्य पूजा करीत होते,रोज भस्म पूजा ,आरती,चालू होती आजही चालू आहे. मंदिर उघडल्याने नागरिक समाधानी असून परळीत कोरोना रुग्ण नगण्य आढळून येत आहेत..त्यामुळे भीतीचे वातावरण कमी झाले असलेतरी काळजी घेणे आवश्यक आहे.