शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
5
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
6
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
7
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
8
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
9
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
10
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
11
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
12
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
13
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
14
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
15
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
19
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
20
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

परळी : तालुक्यात शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्वीच्या मशागतीसह नांगरणे, मोगडणे, उन्हाळी पाळी घालणे, वेचणे ही कामे केली आहेत. चांगला भाव ...

परळी : तालुक्यात शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्वीच्या मशागतीसह नांगरणे, मोगडणे, उन्हाळी पाळी घालणे, वेचणे ही कामे केली आहेत. चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. सोयाबीनची २९ हजार ३४७ हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित पेरणी धरून तालुका कृषी कार्यालयाने नियोजन केले आहे. गेल्यावर्षी सोयाबीन उगवणीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने या हंगामात परळी तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने ३८ गावांत जाऊन घरचे बियाणे पेरणीसाठी व बीज प्रक्रिया करण्याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिके करून दाखविली आहेत. परळी तालुक्यात एकूण लागवड क्षेत्र ६८ हजार १६३ हेक्‍टर असून, त्यापैकी खरीप हंगामात पेरणीसाठी ५५ हजार हेक्‍टर क्षेत्र उपलब्ध होईल. २०२१ - २२मध्ये परळी तालुक्यात सोयाबीनचे २९ हजार ३०० हेक्टर क्षेत्र अपेक्षित आहे. गेल्यावर्षी सोयाबीनचे २५ हजार ९४० हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी होते. यंदा कापसाचे अपेक्षित क्षेत्र १४ हजार हेक्‍टरएवढे आहे. गेल्यावेळी १९ हजार ८७६ हेक्टर क्षेत्र होते. तसेच यंदा खरीप ज्वारीचे बाराशे हेक्‍टर क्षेत्र अपेक्षित आहे. मूग १२०० हेक्‍टर, तूर ४ हजार हेक्‍टर, तर बाजरीचा ९०० हेक्‍टर क्षेत्रात पेरा अपेक्षित आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग या पिकांचा मुख्य पेरा असेल. परळी तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ज्वारी, मूग, तूर, बाजरी, सोयाबीन या पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ करण्याच्या दृष्टीने तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने नियोजन केले आहे. कापूस पिकाखालील क्षेत्र हे ऊस लागवडीसाठी वाढल्यामुळे कापूस क्षेत्रात यावेळी घट होण्याची शक्यता आहे. सोयाबीन, तूर, मुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना बियाणे उगवणेबाबतीत गावागावात जाऊन मार्गदर्शन करण्यात आले तसेच बोगस बी - बियाण्याबाबत भरारीपथके नेमण्यात आली आहेत.

- अशोक सोनवणे, तालुका कृषी अधिकारी, परळी.

परळी तालुक्यात शेतात नांगरणे, मोगडणे, मशागतीची पेरणीपूर्वीची सर्व कामे चालू असून, ती अंतिम टप्प्यात आहेत. - मनोज यस्के, शेतकरी, नागापूर.