शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:14+5:302021-06-17T04:23:14+5:30

किल्ले धारूर तालुक्यात मागील काही दिवसापासून सतत पावसाची पडत आहे. पेरणी योग्य पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली ...

Farmers focus on sowing with tractor | शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणीवर भर

शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणीवर भर

किल्ले धारूर तालुक्यात मागील काही दिवसापासून सतत पावसाची पडत आहे. पेरणी योग्य पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्याचे दिसून येत आहे.

मागील दोन, तीन वर्षांपूर्वी ग्रामीण भागात ट्रॅक्टर दुर्मिळ प्रमाणात उपलब्ध होते. प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी बैल नांगर, तिफन दिसून यायची. गावातील काही मोजके श्रीमंत शेतकरी पेरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करीत असे. मात्र यावर्षी धारूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी पेरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. त्यामुळे शेतावर बैल दिसत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. कमी वेळामध्ये जास्त काम होत असल्याने शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाला पसंती दिली आहे.

===Photopath===

160621\img-20210616-wa0033.jpg

===Caption===

किल्लेधारुर परिसरात शेतक-यांनी  ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणीवर भर दिला आहे.

Web Title: Farmers focus on sowing with tractor