ज्येष्ठांना सुविधा द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST2021-05-31T04:24:29+5:302021-05-31T04:24:29+5:30

बीड : शासकीय व निमशासकीय व सहकारी बँकांमध्ये वृद्ध, महिला, वयोवृद्ध पेन्शनर व दिव्यांग व्यक्तींना योग्य सेवा ...

Facilitate seniors | ज्येष्ठांना सुविधा द्यावी

ज्येष्ठांना सुविधा द्यावी

बीड : शासकीय व निमशासकीय व सहकारी बँकांमध्ये वृद्ध, महिला, वयोवृद्ध पेन्शनर व दिव्यांग व्यक्तींना योग्य सेवा मिळत नसल्याने, त्यांना मोठ्या गैरसोयीचा व अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोमवारपासून बँका पूर्णवेळ सुरू हेणार असल्याने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

अंमलबजावणी होईना

बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले, तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे लोक दुसऱ्यांना अडचणीत आणत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

रानडुकरांची धास्ती

अंबेजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. शेतात रानडुकरे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहेत. त्रास शेतकऱ्यांना होत आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रस्ता दुरुस्ती करा

बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत लक्ष दिले जात नाही.

हातपंप दुरुस्त करा

बीड : तालुक्यातील पालसिंगण परिसरातील हातपंप नादुरुस्त आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना, हातपंप दुरुस्त करून घ्यावेत, अशी मागणी सरपंच विक्रम खंडागळे यांनी केली.

Web Title: Facilitate seniors