शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
5
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
6
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
7
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
8
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
9
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
10
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
11
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
12
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
13
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
14
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
15
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
19
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
20
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बीजप्रक्रिया मोहिमेला शेतकऱ्यांचा उतम प्रतिसाद - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

गेवराई : कृषी विभागाने खरीप हंगामाची पूर्वतयारी करताना शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी मोहिमा जाहीर केल्या आहेत. त्याप्रमाणे कृषी विभागाचे ...

गेवराई : कृषी विभागाने खरीप हंगामाची पूर्वतयारी करताना शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी मोहिमा जाहीर केल्या आहेत. त्याप्रमाणे कृषी विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करत आहेत.

सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी करूनच पेरणी करावी. त्याची प्रात्यक्षिके प्रत्येक वैयक्तिक शेतकऱ्यांकडे जाऊन करून दाखवली. तसेच चांगली उगवण क्षमता असल्यास घरच्या घरीच असलेले सोयाबीनचे बियाणे पेरणीसाठी वापरावे, असे मार्गदर्शन करत बीजप्रक्रिया व रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने मंडळ कृषी अधिकारी अश्विनी म्हस्के व तालुका कृषी अधिकारी बी.टी. सोनवणे यांनी केले आहे.

२१ मे रोजी ठाकर आडगाव आणि बेलगुडवाडी येथील शेतकऱ्यांना बांधावर खत वाटप व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच जगदीश काळे, भागवत जाधव, ग्राम कृषी संजीवनी समितीचे सदस्य संदीप कोकाटे, यांच्या हस्ते शेतकऱ्यांना गटामार्फत बांधावर खत वाटप करण्यात आले.

दरम्यान बियाणाची पेरणी करण्यापूर्वी बुरशीनाशक आणि रायझोबियम किंवा ॲझोटोबॅक्‍टर पी एस बी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. जेणेकरून दहा टक्के रासायनिक खतांची बचत होईल. पावसाळ्यातील खरीप पिकांची पेरणी शक्यतो बीबीएफ यंत्राद्वारे करावी. तसेच गावोगावी लावलेले जमीन सुपीकता निर्देशांक यानुसारच रासायनिक खतांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सुधाकर कोकाटे, रणजित पवार, नंदकुमार पवार, ऋषिकेश पवार, सतीश पवार, बाबासाहेब पवार, संदीप पवार, विजय पांढरे, ज्ञानेश्वर पांढरे, बाबू कोकाटे यांच्यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यात तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी जातेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप पूर्वतयारी अंतर्गत गाव पातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे.

===Photopath===

240521\3447img-20210524-wa0193_14.jpg