शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
5
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
6
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
7
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
8
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
9
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
10
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
11
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
12
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
13
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
14
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
15
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
19
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
20
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही वन्यप्राणी गणना नाही, पक्षी व वन्यप्राणी प्रेमी निराश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

धारूर : दरवर्षी वैशाख पौर्णिमेला होणारी पक्षी व वन्यप्राणी गणना सलग दुसऱ्या वर्षीही होणार नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या ...

धारूर : दरवर्षी वैशाख पौर्णिमेला होणारी पक्षी व वन्यप्राणी गणना सलग दुसऱ्या वर्षीही होणार नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानंतर यंदाही गणना रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षी व वन्यप्रेमी निराश झाले आहेत. वन्यजीव संरक्षण कार्यात अधिकाधिक लोकसहभाग मिळावा यासाठी वन्यप्रेमींना जनगणनेत सहभागी करून घेतले जाते.

भारतातील जंगलात वन्य प्राण्यांची संख्याही किती, हे मोजण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्था पाऊलखुणा आणि पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या आधारावर वन्य प्राणी गणना केली जाते. त्यामुळे पाणवठे शेजारी मचाण उभारून त्यावर वन्यजीव निरीक्षण करण्यात येते. वन्यजीव अभ्यासासाठी ही गणना महत्त्वाची मानली जाते. या उपक्रमातून पक्षी, प्राणी व पर्यावरणबाबत ज्ञान मिळते. यात स्वयंसेवी संस्थांनाही समाविष्ट केले जाते.

वैशाख पौर्णिमेला दुसऱ्या दिवशीही दुसरी गणना केली जाते. गेल्या वर्षी केंद्र सरकारने २३ मार्च २० रोजी लॉकडाऊन जाहीर केले होते तर ७ मे २० रोजी पौर्णिमा होती त्यामुळे २०२० मध्ये जनगणना झाली नाही. यंदाही लॉकडाऊन असल्याने २६ मे रोजी पौर्णिमेच्या दिवशी गणना केली जाणार नाही.

गणना वैशाखी पौर्णिमेला का?

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या कक्षाजवळ पृथ्वी असते. चंद्राचा लख्ख प्रकाश पृथ्वीवर पडतो. त्यामुळे पक्षी व प्राणी सहज दिसून येतात. मे महिन्यात झाडाची पाने गळालेले असतात त्यामुळे लांबपर्यंत प्राणी मंचकावरून दिसतात. त्यांच्या नोंदी घेऊन त्यांना ओळखणे सोपे जाते तसेच या नोंदीवरून वनविभाग आणि आपल्या क्षेत्रात प्राण्यांची संख्या किती, त्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करणे सुलभ जाते. यासाठी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी प्राणी व पक्ष्यांची नोंदणी केली जाते.

महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या वर्षी वैशाखी पौर्णिमाच्या दिवशी गणना करण्याची मनाई करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षी गणना करण्याची संधी प्राणी व पक्षी प्रेमींना मिळेल अशी अपेक्षा आहे.

शंकर वरवडे (धारूर वनपरीक्षेत्र कार्यालयाचे वनपाल

===Photopath===

240521\3436anil mhajan_img-20210524-wa0087_14.jpg~240521\3442anil mhajan_img-20210524-wa0086_14.jpg