शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

शिक्षण ‘एमएस्सी’... पण, नोकरदाराऐवजी बनला दुचाकीचोर; खर्चासाठी निवडला चुकीचा रस्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 12:22 PM

उच्चशिक्षित असतानाही परिस्थिती आणि जादा पैशांच्या लालसेपोटी तो गुन्हेगारीकडे वळला

ठळक मुद्देपुण्यात एका क्लासवर शिक्षक म्हणून राहिला. त्याच्याकडून विविध कंपनीच्या ४ दुचाकी जप्त केल्या.

बीड : आई-वडिलांनी काबाडकष्ट करून मुलाचे एमएस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्याला पुण्याला पाठविले. मात्र, पुण्यातील खर्च भागत नसल्याने तो चक्क दुचाकीचोर बनला. याच चोरट्याच्या सोमवारी बीडमध्ये मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकाने केली. उच्चशिक्षित असतानाही परिस्थिती आणि जादा पैशांच्या लालसेपोटी तो गुन्हेगारीकडे वळल्याचे सांगितले जात आहे. असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. 

शहाजी पुरी (२८ रा.खांडे पारगाव ता.बीड) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. आई-वडिल, दोन बहिणी आणि एक भाऊ असा त्याचा परिवार. घरी तीन एकर शेती. शेतीवर कुटुंबाचा गाडा चालत नसल्याने वडील मजुरी करतात. अशा परिस्थितीतही वडिलांनी शहाजीचे शिक्षण पूर्ण केले. त्याचा एमएससी पर्यंतचा सर्व खर्च केला. त्यानंतर तो मागील दोन वर्षांपासून पुण्याला गेला. येथे एका क्लासवर शिक्षक म्हणून राहिला. येथे केवळ दहा ते बारा हजार रूपये मिळायचे. मेट्रोसिटीमध्येही पगार खुपच कमी होता. त्यामुळे त्याचा खर्च भागत नव्हता. इतरांसारख्या त्याच्याही अपेक्षा वाढल्या होत्या. असे असतानाच त्याच्या मनात दुचाकी चोरीचा विषय आला.

नोकरी सोडून चार दिवस विचार केल्यावर तो बीडला आला आणि दुचाकी चोरली. याच दुचाकीतून त्याला २५ हजार रूपये मिळाले. त्याला लालच लागली. त्यानंतर तो पुण्यात गेला. नोकरी सोडून दुचाकी चोरीचा व्यवसाय सुरू केला होता. सध्या तो जोमात असतानाच सपोनि अमोल धस, पोउपनि रामकृष्ण सागडे यांना माहिती मिळाली. त्यांनी याबाबत सोमवारी सापळा लावला. या सापळ्यात शहाजी अलगद अडकला. त्याला खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याच्याकडून विविध कंपनीच्या ४ दुचाकी जप्त केल्या.

शहाजीला सध्या बीड शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, पोनि. घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे सपोनि अमोल धस, नसीर शेख, साजीद पठाण, सखाराम पवार, राजू वंजारे, विशेष पथकाचे पोउपनि. रामकृष्ण सागडे, पांडुरंग देवकते, अंकुश वरपे, गणेश नवले, रेवणनाथ दुधाने, जयराम उबे आदींनी केली.

दुचाकी विकून पुन्हा तिचीच चोरीएक दुचाकी चोरली की ती विक्री करून पैसे काढायचे. पुन्हा चार महिन्यांनी त्याच दुचाकीवर पाळत ठेवून तिची चोरी करायची, असा फंडा शहाजीचा होता. तीच दुचाकी पुन्हा चोरल्यामुळे मालक कागदपत्रे नसल्याने तिची तक्रार द्यायला ठाण्यात जात नव्हता. हा प्रकार शहाजीला माहीत होता. पुन्हा त्याच दुचाकीची पुन्हा विक्री करायचा. हा फंडा त्याचा अनेक ठिकाणी यशस्वी झाला होता.शहाजी हा हुशार होता. मात्र, परिस्थितीमुळे तो गुन्हेगारीकडे वळला. त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. २८ फेब्रुवारीला त्याची एमपीएससीची लेखी परीक्षा होती, असे सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वीच त्याला अटक झाली.

टॅग्स :theftचोरीbikeबाईकPoliceपोलिस