आरोग्य उपसंचालकांची केज रुग्णालयास अचानक भेट - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:01+5:302021-06-24T04:23:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क केज : येथील उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाचे कामकाज हे इतर विभागांच्या कामकाजापेक्षा अधिक पटीने चांगले असून, ...

Deputy Director of Health Visits Cage Hospital - A | आरोग्य उपसंचालकांची केज रुग्णालयास अचानक भेट - A

आरोग्य उपसंचालकांची केज रुग्णालयास अचानक भेट - A

लोकमत न्यूज नेटवर्क

केज : येथील उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाचे कामकाज हे इतर विभागांच्या कामकाजापेक्षा अधिक पटीने चांगले असून, हे कामकाज जास्तीचे व सरस असल्याने या विभागातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, अशा शब्दात लातूर येथील आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी प्रशंसा केली. डॉ. माले यांनी मंगळवारी येथील उपजिल्हा रुग्णालयास अचानक भेट देऊन रुग्णालयातील कामकाजाची पाहणी केली. स्त्री रोग विभागात काम करणारे डॉ. भाऊसाहेब चाळक, डॉ. केशव इंगोले यांच्यासह भूलतज्ज्ञ डॉ. बालासाहेब सोळंके, डॉ. डिंगाबर मुंडे यांनी मागील तीन महिन्यांच्या काळात आतापर्यंत जवळपास २६४ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व लहान-मोठ्या शस्त्रक्रिया, तर ४७६ स्त्रियांची प्रसूती केली. तसेच कोरोना काळातही स्त्रीरोग विभागाचे कामकाज सुरूच होते, अशी माहिती उपसंचालकांना देण्यात आली. त्यावर या विभागाप्रमाणे इतर विभागांचे कामकाजदेखील वाढले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. माले यांनी व्यक्त केली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. केशव इंगोले, भूलतज्ज्ञ डॉ. बालासाहेब सोळंके, डॉ. डिंगाबर मुंडे, अस्थी रोगतज्ज्ञ डॉ. विशाल करपे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

पेशंट रेफरचे प्रमाण घटले

रुग्णालयातील पेशंट रेफरच्या प्रमाणात निश्चितच घट झाली असल्याने आरोग्य उपसंचालकांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील रुग्णांचा ओढा हा शासकीय रुग्णालयाकडेच असूूून, तो वाढत आहे. त्यामुळे येथे सेवा देणाऱ्या डॉक्टर मंडळींनी रुग्णांना चांगली व तत्पर सेवा द्यावी. रुग्णालयाचा कारभारात आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे उपसंचालक डॉ. माले म्हणाले.

===Photopath===

220621\3359img-20210622-wa0024.jpg~220621\3359img-20210622-wa0025.jpg

===Caption===

आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी केज येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय राऊत,स्त्री रोग तज्ञ डॉ.केशव इंगोले,भूलतज्ञ डॉ.बालासहेब सोळंके,डॉ.डिंगाबर मुंडे,अस्थी रोग तज्ञ म्हणून काम करणारे डॉ.विशाल करपे आदी.~आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी केज येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय राऊत,स्त्री रोग तज्ञ डॉ.केशव इंगोले,भूलतज्ञ डॉ.बालासहेब सोळंके,डॉ.डिंगाबर मुंडे,अस्थी रोग तज्ञ म्हणून काम करणारे डॉ.विशाल करपे आदी.

Web Title: Deputy Director of Health Visits Cage Hospital - A