आईचा खून करणाऱ्या मुलाची कोठडीत रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:35 IST2021-08-23T04:35:56+5:302021-08-23T04:35:56+5:30

खर्चायला पैसे देत नाही, शेजाऱ्यांकडेच जाऊन का बसते, मुलाला जेवण वेळेवर का देत नाही, या क्षुल्लक कारणावरून चौसाळा येथे ...

Departure of the child who killed the mother to the cell | आईचा खून करणाऱ्या मुलाची कोठडीत रवानगी

आईचा खून करणाऱ्या मुलाची कोठडीत रवानगी

खर्चायला पैसे देत नाही, शेजाऱ्यांकडेच जाऊन का बसते, मुलाला जेवण वेळेवर का देत नाही, या क्षुल्लक कारणावरून चौसाळा येथे

प्रयागबाई पांडुरंग मानगिरे (७०) या महिलेस दारूच्या नशेत मुलगा

मदन पांडुरंग मानगिरे (२८) याने चप्पल, काठीने मारहाण केली. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, संतापलेल्या मदनने मुसळ डोक्यात घातली. त्यामुळे प्रयागबाई गंभीर जखमी झाल्या. काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, मुलगा मदन याची नशा उतरल्यावर आपल्या ७ वर्षाच्या मुलाला घेऊन त्याने दुचाकीवरून महाकाळा (ता.अंबड) येथे सासरवाडीला धूम ठोकली. मात्र, नेकनूर पोलिसांनी राक्षसभुवन फाट्यावरून (ता.गेवराई) पाठलाग करून त्याला जेरबंद केले. पांडुरंग मानगिरे यांच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. २२ ऑगस्ट रोजी मदन मानगिरे यास जिल्हा न्यायालयात हजर केले असता २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी दिली.

Web Title: Departure of the child who killed the mother to the cell