चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST2021-05-30T04:27:07+5:302021-05-30T04:27:07+5:30

केज : तालुक्यातील युसूफ वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे ...

Dedication of four ambulances | चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण

चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण

केज

: तालुक्यातील युसूफ वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले.

बीड जिल्हा परिषदेच्या वतीने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आली होती. या कामासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना विनंती करण्यात आल्याने जिल्ह्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. या सात रुग्णवाहिकांपैकी चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

ग्रामीण भागातील रुग्णांना ने-आण करण्यासाठी या रुग्णवाहिकांची मदत होणार आहे. या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी पंचायत समिती सदस्य उमाकांत भुसारी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. आठवले, वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्राम्हणे मॅडम, प्रवीण पवार, रूपेश बोरगावकर, अरुण राऊत, चंदू थळकरी, अमोल पाटील, मुकुंद गायकवाड, भैय्या पोटभरे, आकाश गायकवाड व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Dedication of four ambulances