केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरीत चुलत भावानेच केला भावाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 23:47 IST2026-01-31T23:47:08+5:302026-01-31T23:47:53+5:30

- मधुकर सिरसट लोकमत न्यूज नेटवर्क केज,दि.31 :तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथील 25 वर्षीय विकी उर्फ आण्णा चंदनशिव या युवकाचा ...

Cousin kills brother in Uttareshwar Pimpri, Kage taluka | केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरीत चुलत भावानेच केला भावाचा खून

केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरीत चुलत भावानेच केला भावाचा खून

- मधुकर सिरसट
लोकमत न्यूज नेटवर्क
केज,दि.31 :तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथील 25 वर्षीय विकी उर्फ आण्णा चंदनशिव या युवकाचा त्याच्या सखा चुलत भाऊ महेश उतरेश्वर चंदनशिव याने धारदार शस्त्राने  त्याचा गळा चिरून खून केल्याची घटना केवड आणि उत्तरेश्वर  पिंपरीच्या सीमेवरील शिवारात घडली आसून या मुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथील विक्की उर्फ आण्णा रावसाहेब चंदनशिव वय 25 वर्षे या युवकाला  त्याचा चुलत भाऊ महेश उतरेश्वर चंदनशिव याने केवड व पिंप्रीच्या शिवावरील शेतात शुक्रवारी रात्री घेवून जाऊन त्याला बेशुद्ध होईपर्यंत दारू पाजून त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने त्याचा गळा कापून त्याचा  खून करून त्याचे प्रेत रस्त्यावर टाकून आरोपी फरार झाला होता. याप्रकारणी केज पोलिसात गून्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालु आहे.

एक तासात आरोपी जेरबंद...

 या घटनेची माहिती शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या उघडकीस आली.केज पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी तपासाचे चक्र गतिमान करून व स्वतः घटनास्थळी जाऊन  मयताची ओळख पटविली. व एक तासाच्या आत आरोपीचा शोध लावून  महेश उतरेश्वर चांदनशिव  वय 25 वर्षे याला जेरबंद केले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने मी घरगुती करणा वरून व भूखंडाच्या कारणातून खून केल्याची कबुली दिली.

घटनास्थळी  पोलीस अधिकारी..
 खुनाची बातमी समजताच घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके,सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम,पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे,पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर,पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम,पोलिस उपनिरीक्षक आमिर इनामदार,पोलिस उपनिरीक्षक  महेश क्षीरसागर, सहाय्यक फौजदार अशोक सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन मयताच्या नातेवाईकांशी संवाद साधला

Web Title : केज तालुका: चचेरे भाई ने जमीन विवाद में भाई की हत्या की

Web Summary : केज में, 25 वर्षीय एक व्यक्ति की उसके चचेरे भाई ने जमीन और पारिवारिक मुद्दों को लेकर हत्या कर दी। अपराध का पता चलने के एक घंटे के भीतर आरोपी को गिरफ्तार कर लिया गया। पुलिस जांच जारी है।

Web Title : Cousin Kills Brother Over Land Dispute in Kej Taluka

Web Summary : In Kej, a 25-year-old man was murdered by his cousin following a dispute over land and family issues. The accused was arrested within an hour after the crime was discovered. Police investigation is underway.