शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची धास्ती पण पालक म्हणतात, ऑफलाईन परीक्षाच योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST

बीड : राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना ...

बीड : राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना ऑफलाईन परीक्षेच्या निर्णयामुळे काही पालक धास्तावले असलेतरी ऑनलाईन परीक्षा गुणवत्तेला मारक आहेत. कोरोनाबाबत दक्षता घेत होम सेंटरवर परीक्षा घेतल्यास अडचणी येणार नाहीत, असे त्यांचे मत आहे.

कोरोनामुळे काही महिने ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. यातही अनेक अडचणी आल्या. त्यानंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. उपस्थितीचे प्रमाणही वाढत गेले. कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे शिक्षकांपुढे तर पूर्ण अभ्यास करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांपुढे होते. यातच कोरोना संसर्ग कमी होत चालल्याने सुरळीतपणा येत असताना राज्यात काही ठिकाणी पुन्हा काेरोनाचा उद्रेक झाला. बीड जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ५५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी १७ हजार ६२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

रुग्णसंख्या वाढू लागल्याने शासन व प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यासाठी पावले उचलली. तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु बैठक व्यवस्था, पसरणारा कोरोना संसर्ग, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. मात्र, शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे बहुतांश पालकांनी स्वागत केले आहे. तर काही पालक ऑनलाईनऐवजी ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेतल्याने आमच्या पाल्याचा जीव धोक्यात घालायचा का? असा सवाल करीत आहेत.

--------

दहावी-बारावीतील पालकांच्या प्रतिक्रिया

ऑनलाईनमुळे अभ्यास करणाऱ्या मुलांचे नुकसान झाले असते. सगळीकडेच ऑनलाईन परीक्षा शक्य नाही. कोरोनाची भीती आहे. मात्र, दक्षता घेऊन ऑफलाईन परीक्षाच योग्य आहेत. - दगडू खांडे.

----------

पुरेशा नेटवर्कचा अभाव आजही आहे. कोरोनाची भीती आहे. परंतु, हॉलमध्ये विद्यार्थी संख्या दहाच्या प्रमाणात ठेवून परीक्षा घ्यायला हव्यात. कॉपी पुरविणाऱ्यांपासून संसर्ग टाळण्यासाठी उपाय करावेत. - राजेंद्र आघाव.

------

परीक्षा ऑफलाईन होणे गरजेचे होते. ॲन्ड्राइड फोन, नेटवर्क, तांत्रिक अडचणी आहेतच. ऑफलाईन परीक्षा ज्या-त्या शाळेत घेतल्या तर तेच विद्यार्थी राहतील, अडचणी येणार नाहीत. दुसऱ्या भागातील संपर्क टाळता येईल. - गणेश आजबे.

----------

ऑफलाईन परीक्षेत मुलांचा आत्मविश्वास टिकून राहतो. ऑनलाईनमध्ये पेज सेंड न होणे, हँग होणे यामुळे मुलांमध्ये नैराश्य आले असते. दडपण राहिले असते. ऑफलाईन परीक्षाच योग्य आहेत. - श्रीराम तागड.

------

मुलांना ऑनलाईन परीक्षेचा अनुभव नाही. ऑफलाईन परीक्षाच याेग्य आहेत. मात्र, सोशल डिस्टन्स तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन सर्वांनीच करणे गरजचे आहे. - सविता राजेंद्र काळे.

-----

कोरानाचे संकट मोठे आहे. जे मुलांच्या हिताचे आहे, ते महत्त्वाचे आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी सेंटर कोणतेही आले तर अडचण नाही. सगळेच ऑनलाईन होऊ शकत नाही. परीक्षेनंतर मुलांना कोरोना लस देण्याचा विचार व्हावा. - राजेश सुपेकर.

--------

कोरोनाचा धोका वाटतो. भविष्याचा विचार करता ऑफलाईन परीक्षा योग्यच आहे. ऑनलाईन शक्य नाही. मुलांना बोर्डाच्या परीक्षेचा सराव आवश्यक आहे. बारावीला भीती राहणार नाही. - महेश सातपुते.

----------

मोबाईलवर, संगणकावर परीक्षा कशी घेणार? नियमित होतात तशा परीक्षा व्हाव्यात. वर्ष वाया चालले. कोरोनाबाबत सर्वांनीच काळजी घेतली तर काहीच हरकत नाही. ऑफलाईन परीक्षाच योग्य वाटते. - रमेश मोरे.

------

विद्यार्थी संख्या

दहावी ४५०००

बारावी ४१०००

------

होम सेंटरच ठरणार पर्याय

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर बैठक व्यवस्थेची अडचण राहणार आहे. एका परीक्षा कक्षात २५ विद्यार्थी असतात. मात्र, निम्म्या संख्येने बैठक व्यवस्था करावयाची असल्यास परीक्षा केंद्रे अपुरी पडतील. तसेच आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी ज्या शाळेत आहे, तेथेच परीक्षा घेण्याचा (होम सेंटर) हा पर्याय पुढे येऊ शकतो. असा निर्णय झाल्यास पालकांमध्ये असलेली कोरोनाची धास्तीदेखील कमी होऊ शकते.

-----