शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियमांमुळे मद्यपी वाहनचालकांवरील कारवाया घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

ब्रिथ अल्कोहोल ॲनालायझरचा वापर बंद : चालू वर्षात फक्त ८० मद्यपींवर कारवाई बीड : राज्य महामार्ग रस्ते विकसित करण्याच्या ...

ब्रिथ अल्कोहोल ॲनालायझरचा वापर बंद : चालू वर्षात फक्त ८० मद्यपींवर कारवाई

बीड : राज्य महामार्ग रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहेत. त्याचसोबत अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, तरी देखील विविध कारणास्तव होणाऱ्या अपघातांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यातच सर्वाधिक अपघात हे दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे झाल्याचे वेळोवेळी समोर आलेले आहे. कोरोनाकाळात ब्रिथ अल्कोहोल ॲनालायझरचा वापर बंद केल्यामुळे मागील सहा महिन्यांत फक्त ८० कारवाया करण्यात आल्या आहेत.

वाहनचालकाने दारू पिऊन वाहन चालवू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून ‘ड्रंक ॲन्ड ड्राइव्ह’च्या कारवाया केल्या जातात. वाहतूक शाखा तसेच महामार्ग पोलीस व पोलीस ठाणे हद्दीत या कारवाया केल्या जातात; परंतु कोरोना महामारी सुरू झाल्यापासून एकमेकांपासून सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच चालक दारू पिलेला आहे की नाही, यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रिथ अल्कोहल ॲनालायझर वापरावर कोरोनामुळे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या कारवायांमध्ये मोठी घट झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, २०१९ या वर्षात १ हजारपेक्षा जास्त ड्रंक ॲन्ड ड्राइव्हच्या कारवाया करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर २०२० या वर्षात जवळपास ३०३ कारवाया करण्यात आल्या आहेत, तर मागील सहा महिन्यांत फक्त ८० कारवाया झाल्या आहेत. कोरोनाच्या नियमांमुळे मद्यपी वाहनचालक बिनधास्त फिरत आहेत, तरीदेखील संशय आल्यावर पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत.

...

ब्रिथ ॲनालायझरचा वापर बंद

कोरोना संसर्गजन्य रोग आहे. ब्रिथ ॲनालायझरचा वापर केल्यास त्याचा प्रसार होण्याची शक्यता होती. हा धोका ओळखून ब्रिथ ॲनालायझरचा वापर न करण्याच्या सूनचा वाहतूक शाखेला देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे फक्त संशय आल्यानंतरच पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

...

पोलीस प्रशासनाचे आवाहन

राज्य महामार्गावर वाहन चालविताना काही जण मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असतात. अशा वाहनचालकांमुळे राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. या अपघाताला नियंत्रित करण्यासाठी वाहतूक शाखा व महामार्ग पोलीस ठिकठिकाणी तपासणी करून कारवाया करत आहेत. एखादा चालक मद्यधुंद अवस्थेत आढळला तर, त्याच्यावर कारवाई करण्यात येते. २०१९ या वर्षात सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या होत्या, तर २०२० व २०२१ या वर्षात कोरोनाच्या नियमांमुळे कारवाया कमी झाल्या आहेत. दरम्यान, वाहनचालकांनी स्वत:च्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी सुरक्षित वाहन चालवावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

....

वाहतूक शाखा अपघात रोखण्यासाठी व वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी विविध उपाययोजना करत आहे. कोरोना काळात मद्यधुंद वाहनचालकांवरील कारवाया घटल्या आहेत. मात्र, तरी देखील वाहतूक शाखेकडून नशेत असलेल्या चालकांवर अपघात टाळण्यासाठी त्वरित कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच दंडात्मक कारवाई करून गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी सुरक्षित वाहन चालवावे, असे आवाहन वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडून केले जाते.

- कैलास भारती, वाहतूक शाखा प्रमुख, बीड.

....

२०२१ मध्ये मद्यपींवर झालेली कारवाई (जूनअखेर)

जानेवारी ३३, फेब्रुवारी ०४, मार्च ०४, एप्रिल ०९, मे २२, जून ०७.