शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यावर्षीही आषाढी वारीवर कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST

वारकऱ्यांचे आगमन होणार नसल्याने पालखी मार्गही सामसूम अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : अंबाजोगाईमार्गे दरवर्षी शंभर ते सव्वाशे ...

वारकऱ्यांचे आगमन होणार नसल्याने पालखी मार्गही सामसूम

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : अंबाजोगाईमार्गे दरवर्षी शंभर ते सव्वाशे लहान-मोठ्या दिंड्या पंढरपूरकडे पायी जातात. परंतु मागील वर्षीप्रमाणे कोरोनामुळे यंदाही या दिंड्यांचे दर्शन अंबाजोगाईकरांना होणार नसल्याने हा भक्तीचा महिना सुनासुना वाटत आहे.

यावर्षी समाधानकारक पाऊस पडला. पेरण्याही उरकल्या. इतरवेळी कधी पेरण्या करून, नाही तर घरातील इतर सदस्यांवर पेरणीची जबाबदारी टाकून आषाढी वारीनिमित्त नित्यनियमाने अनेक वारकरी पंढरपूर गाठतात. दरवर्षी पंढरपूरला पायी वारीला जाणाऱ्या विविध दिंड्या अंबाजोगाईमार्गेच जातात. आषाढी एकादशीच्या जवळपास एक महिना आधी या दिंड्या त्यांच्या मूळ गावातून निघतात. अंबाजोगाई येथे पोहोचल्यानंतर पुढे आठ ते दहा दिवसांत पंढरपूर गाठायचे, असे त्यांचे नियोजन असते. मागीलवर्षी दिंड्यांची ही वर्षानुवर्षे चालणारी परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे.

पालखी मार्ग तयार झाला; मात्र वारकरीच नाहीत!

विदर्भ व नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतून अनेक दिंड्या निघतात. मात्र नागरिकांना मोठी उत्सुकता असते, ती संत श्री गजानन महाराज यांच्या दिंडीची. ही दिंडी परिसरातील भाविकांचे मोठे श्रध्दास्थान बनले आहे. हरिनामात तल्लीन असलेल्या वारकऱ्यांनी पूर्वी या मार्गावरील चिखल तुडवीत, खड्ड्यांचा अडथळा पार करीत अनेक वर्षे पंढरी गाठली. मात्र आता हा रस्ता चौपदरीकरणामुळे व्यवस्थित झाला आहे. परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे पंढरपूरमध्ये ''नो एन्ट्री'' असल्याने वारकरी वारीसाठी निघालेच नाहीत. त्यामुळे पालखी मार्ग झाला; पण वारकरीच नाहीत, असे चित्र सध्या दिसत आहे. सलग दोन वर्षे दिंडीची परंपरा कोरोना प्रादुर्भावामुळे खंडित झाली. यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे व तिसऱ्या लाटेच्या भीतीने शासनाने वारीच रद्द केल्याने सलग दुसऱ्यावर्षी वारकरी आणि विठ्ठल यांची भेट होणार नाही. दरवर्षी आषाढी एकादशीसाठी अंबाजोगाईमार्गे जवळपास शंभर ते सव्वाशे लहान-मोठ्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. यातील अनेक दिंड्यांना मोठी परंपरा लाभलेली आहे.

अंबाजोगाई येथील रहिवाशांनी विविध दिंडीतील वारकऱ्यांना अन्नदानाची परंपरा पिढ्यानपिपिढ्या जोपासली आहे. दरवर्षी आषाढी वारीसाठी जाणाऱ्या सर्वच दिंड्यातील वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था येथे होते. यंदाही ही परंपरा खंडित झाल्याने काहीतरी राहून गेले, अशी रुखरुख झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

शेगाव संस्थानची दिंडी ही आषाढी वारीसाठी जाणारी सर्वात जास्त वारकरी असलेली दिंडी असते. दरवर्षी अंबाजोगाई येथे मुक्कामी असलेल्या या दिंडीतील संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे हजारो भक्त दर्शन घेतात. मागील आणि यावर्षीही दिंड्यांना परवानगी नसल्याने महाराजांचे दर्शन होणार नसल्याची खंत भाविकांना आहे. ज्ञानदेव, तुकारामाचा गजर करीत भक्तीत तल्लीन होऊन निघालेल्या या वारकऱ्यांमुळे अंबाजोगाई शहरात तसेच या मार्गावरील गावातही भक्तिमय वातावरण असते. अनेक ठिकाणी मुक्काम, भोजन व पहाटे भजन-कीर्तन करून हे वारकरी पुढे प्रस्थान करतात. यावर्षीही तो सत्संग घडणार नसल्याने भाविकांनाही चुकल्यासारखे वाटणार आहे.