शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

आष्टी-कडा रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा; महिनाभरात १० अपघातात ४ जणांनी गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 16:46 IST

महिनाभरात एकूण १० अपघात ४ बळी जाऊन अनेकजण अधू झाले आहेत.

ठळक मुद्देपुन्हा चारचाकी दुचाकीच्या अपघातात एक गंभीर जखमीबीड - आष्टी - अहमदनगर महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

- अविनाश कदम आष्टी : बीड - आष्टी - अहमदनगर मार्गावर शुक्रवार दि.८ रोजी पोखरी गावाजवळ दुचाकी चारचाकी धडकेत पती जागीच ठार तर पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा सकाळी आष्टी शहराजवळील हंबर्डे  काॅलेजजवळ आतिश उबाळे (२२) हे घराकडून आष्टी येथील पंपावर कामाला जात असताना अपघातात गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी ९ च्या दरम्यान घडली. दरम्यान, या मार्गावर डिसेंबरपासून आजपर्यंतचा हा ११ वा अपघात ठरला आहे.

चालकांचा वेगावर अंकुश नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. वाहन चालक यामार्गावर बेभान वाहने चालवताना दिसून येतात. तालुक्यातील पांढरी येथील युवक आतिश उबाळे ( २२ )  नाथ पेट्रोल पंपावर सकाळी घराकडून दुचाकीवर ( क्रं.MH23A6611 ) जात असताना नगरहून बीडमार्गे जात असलेल्या चारचाकीने (क्रं. MH09BB0012 ) जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी आतिश उबाळे याला उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे. 

दरम्यान, यामार्गावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. चिंचपूर - आष्टी - कडा २७ किलोमीटर अंतरावर डिसेंबर ते आजपर्यंत १० मोठ्या अपघातात ४ जणांचा अपघातात जीव गमावावा लागला असून अनकेजण गंभीर जखमी होऊन अधू झालेले आहेत. यामुळे या रस्त्यावर गतिरोधक टाकून वेगाला मर्यादा घालाव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वाढत्या अपघातांना ब्रेक लावा नवीन रस्ता असल्याने वाहनचालक अधिक वेगाने गाडी चालवत आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने प्रशासनाने हे गांभीर्याने घ्यावे.-  राम नागरगोजे सामाजिक कार्यकर्ते

वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करावा. वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूकीच्या नियमांचे पालन करून आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. - सलीम चाऊस, पोलिस निरीक्षक, आष्टी

टॅग्स :AccidentअपघातBeedबीडDeathमृत्यू