'मुलाचा खून झाला अन् बाप हॉटेलात नाष्टा करतोय'; चाणाक्ष पोलिसांनी यावरून केला खुनाचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 05:14 PM2021-10-21T17:14:20+5:302021-10-21T17:22:29+5:30

Father killed alcoholic son: तरुण व्यसनाधीन होता मात्र त्याचे गावात कोणाशी भांडण नसल्याने तपासाचे आव्हान होते

'Child killed, father eating breakfast at hotel'; The clever police revealed the murder | 'मुलाचा खून झाला अन् बाप हॉटेलात नाष्टा करतोय'; चाणाक्ष पोलिसांनी यावरून केला खुनाचा उलगडा

'मुलाचा खून झाला अन् बाप हॉटेलात नाष्टा करतोय'; चाणाक्ष पोलिसांनी यावरून केला खुनाचा उलगडा

Next
ठळक मुद्देमुलगा दारू पिऊन आईवडील आणि नातेवाईकांना त्रास देत असे रागाच्या भरात वडिलांनी धारदार शस्त्राने मुलावर वार केला

- दीपक नाईकवाडे

केज ( बीड ) : तालुक्यातील दैठणा येथे एका ३८ वर्षीय तरुणाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चाणाक्ष पोलिसांनी अत्यंत जलद तपास करत अवघ्या बारा तासात आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाचा खून साळसूदपणाचा आव आणणाऱ्या त्याच्या बापानेच केल्याचे उघडकीस ( Father killed alcoholic son ) आले आहे. पोलीस चौकशीत पोटच्या पोराचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी की, बुधवारी ( दि. २०) तालुक्यातील दैठणा येथे विशाल चंद्रकांत मुळे या ३८ वर्षीय विवाहित तरुणाचा अज्ञात व्यतीने खून करून मृतदेह स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यात टाकल्याची खळबळजनक घटना घडली होती. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. विशालला दारूचे व्यसन होते मात्र त्याचे गावात कोणाशी भांडण नव्हते, यामुळे खून कोणी आणि का केला याच्या तपासाचे आव्हान पोलिसांच्या पुढे होते. 

तपासात श्वान पथकाची देखील मदत घेण्यात आली मात्र हाती काही लागले नाही. मात्र, अंत्यसंस्कार होताच पोलिसांनी संशयावरून मृताचे वडील चंद्रकांत उद्धव मुळेला ( ६० ) ताब्यात घेतले. व्यसनाधीन मुलगा दारू पिऊन आईवडील आणि नातेवाईकांसोबत सतत भांडण करत असे, याला वैतागून धारदार शस्त्र डोक्यात मारले आणि त्याचाच घाव वर्मी बसला. यातच मुलाचा मृत्यू झाल्याची कबुली चंद्रकांत मुळेने दिली. 

मुलाचा खून झाला अन बाप हॉटेलात नाष्टा करतोय 
या खुनाचा तपास करताना पोलीस अधिकाऱ्यांना काहीच पुरावा सापडत नव्हता. कुटुंबातील सदस्य ही काहीच बोलत नव्हते. वडिलांच्या चेहऱ्यावर सुद्धा मुलाच्या मृत्यूचे दुःख दिसत नव्हते. दरम्यान, पंचनामा करत असताना चद्रकांत याने  हॉटेलमध्ये जाऊन नाष्टा केला नेमकी हीच गोष्ट पोलीस अधिकाऱ्यांना खटकली. यावरून अंत्यविधी आटोपताच पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. या खुनाच्या तपासात अतिरिक्त पोलीस अधिक्षक सविता नेरकर व सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कादरी, पोलीस जमादार शिवाजी शिनगारे, अशोक नामदास, अनिल मंदे, जसवंत शेप, शेख, शेषेराव यादव, हुंबे आणि दिलीप गित्ते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

Web Title: 'Child killed, father eating breakfast at hotel'; The clever police revealed the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app