कुत्र्याला वाचवताना कारला अपघात; महिलेसह ४ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:32 AM2019-11-24T00:32:47+5:302019-11-24T00:33:06+5:30

तेलगाव ते धारूर राष्ट्रीय महामार्गावर भोगलवाडी फाटा येथे कारला अचानक कुत्रा आडवा आला. कुत्र्याला वाचवताना झालेल्या अपघातात कारमधील चौघे जखमी झाले असून, यात एका महिलेचा समावेश आहे.

Car accident while rescuing dog; 3 injured including woman | कुत्र्याला वाचवताना कारला अपघात; महिलेसह ४ जखमी

कुत्र्याला वाचवताना कारला अपघात; महिलेसह ४ जखमी

Next
ठळक मुद्देभोगलवाडी फाट्याजवळ घडली घटना

धारुर : तेलगाव ते धारूर राष्ट्रीय महामार्गावर भोगलवाडी फाटा येथे कारला अचानक कुत्रा आडवा आला. कुत्र्याला वाचवताना झालेल्या अपघातात कारमधील चौघे जखमी झाले असून, यात एका महिलेचा समावेश आहे. सर्व जखमींवर लातूर येथील रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
कोल्हापूर येथील बजाज परिवार कारने (एमएच ०९ डीए ६३५०) शनिवारी सेनगाव येथून तेलगावमार्ग कोल्हापूरला जात होते. तेलगाव जवळच असलेल्या भोगलवाडी फाट्याजवळ त्यांची कार आली असता याठिकाणी असलेल्या पुलाजवळ त्यांच्या कारला अचानक एक कुत्रा आडवा आला. सदरील कुत्र्याला वाचवताना ही कार उलटून कारची चारही चाके वर झाली. यावेळी जाणाऱ्या येणाऱ्यांसह जवळच शेतात काम करणाºया नागरिकांनी कारमधील जखमी लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.
या अपघातामध्ये दिलीप दामोदर बजाज, विद्या दिलीप बजाज, गणेश दिलीप बजाज सर्व (रा. माळी कॉलनी कोल्हापूर), तर नंदकिशोर बाहेती (रा. बालाजीनगर वसमत) हे जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम धारुर व नंतर लातूर येथील विवेकानंद रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्वच जखमींवर उपचार सुरु आहेत.

Web Title: Car accident while rescuing dog; 3 injured including woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.