शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बेडवरून उठताही येत नाही; घाबरू नका, लवकरच घरी येऊन दिली जाणार लस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:28 IST

बीड : जे लोक अंथरुणाला खिळून आहेत, बेडवरून उठता येत नाही, अशा लोकांनी कोरोना लस घेण्यासाठी केंद्रावर येण्याची गरज ...

बीड : जे लोक अंथरुणाला खिळून आहेत, बेडवरून उठता येत नाही, अशा लोकांनी कोरोना लस घेण्यासाठी केंद्रावर येण्याची गरज आहे. आरोग्य विभागाकडून घरी जाऊन लस देण्याचे नियोजन केले जात आहे. यासाठी आशाताई, अंगणवाडी सेविकांमार्फत माहिती घेणेही सुरू झाले आहे. यामुळे बेडवर असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्याला अद्यापही अपेक्षेप्रमाणे कोरोना लसीचे डोस मिळालेले नाही. आठवड्याला केवळ २० ते २५ हजार डोस पुरविले जात आहेत. हा आकडा लाभार्थ्यांच्या तुलनेत खूपच अपुरा आहे. त्यामुळे केंद्रावर आलेल्या लोकांना लस न घेताच रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. त्यामुळे लसीकरणाची गती संथ असून, आतापर्यंत केवळ ६ लाख ६० हजार लोकांना डोस टोचण्यात आली आहे. असे असतानाच आता शासनाने हायरिस्क लोकांना घरी जावून लस देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे बीड आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले असून, सर्वेक्षण करून अंथरुणाला खिळलेल्या व बेडवर असलेल्या लोकांची माहिती घेणे सुरू आहे. येत्या आठवडाभरात सर्वेक्षण पूर्ण होणार असून, लवकरच शासनाच्या आदेशानुसार लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

पुणे, मुंबईत सुरुवात, बीडमध्येही लवकरच

शासनाच्या आदेशाप्रमाणे पुणे व मुंबई या ठिकाणी अशाप्रकारे लसीकरणाला सुरुवातही झाली आहे; परंतु बीडमध्ये अद्याप याला सुरुवात झालेली नसली तरी सर्वेक्षण पूर्ण होताच घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे. ही लस केवळ जे बेडवर आहेत, ज्यांना घराबाहेर पडणे अशक्यच आहे, अशांनाच दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार केली जाणार आहे.

--

शासनाच्या निर्देशाप्रमाणे अंथरुणाला खिळून असलेल्यांना घरी जावून लस दिली जाणार आहे. त्यासाठी आशाताई, अंगणवाडी सेविकांमार्फत सर्वेक्षण सुरू असून, येत्या दोन चार दिवसांत ते पूर्ण होईल. त्यानंतर लसीकरणाला सुरुवात केली जाईल. यासाठी स्वतंत्र यंत्रणेचे नियोजन केले जाईल.

डॉ.रौफ शेख, नोडल ऑफिसर बीड

---

आतापर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस ५,११,४०६

दुसरा डोस १,४९,४६३

एकूण लसीकरण ६,६०,८६९

----

६० वर्षांवरील लसीकरण

पहिला डोस १,८४,५२६

दुसरा डोस ५७,५३२

240721\24_2_bed_15_24072021_14.jpeg

डाॅ.रौफ शेख