शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

प्रवेशाआधीच मेडिकलचे ७०/३० धोरण रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:11 AM

बीड : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत अन्यायकारक व घटनाबाह्य ७०/३० प्रादेशिक आरक्षणामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बीडसह इतर जिल्ह्यातून उठाव होत असून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पालक व शिक्षणप्रेमी पाठपुरावा करत आहेत. याबाबत राज्यकर्ते आश्वासन देत आहेत तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने ७०/३० आरक्षण कायम ठेऊन ब्राऊशर प्रसिद्ध केल्याने पुन्हा ...

ठळक मुद्देडीएमइआरकडून मेडिकल प्रवेशाची माहिती पुस्तिका प्रकाशित

बीड : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत अन्यायकारक व घटनाबाह्य ७०/३० प्रादेशिक आरक्षणामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बीडसह इतर जिल्ह्यातून उठाव होत असून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पालक व शिक्षणप्रेमी पाठपुरावा करत आहेत. याबाबत राज्यकर्ते आश्वासन देत आहेत तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने ७०/३० आरक्षण कायम ठेऊन ब्राऊशर प्रसिद्ध केल्याने पुन्हा मराठवाड्यावर अन्याय होणार आहे. प्रवेशप्रक्रिया सुरु होण्याआधी हे ब्राऊशर रद्द करण्याची मागणी आता जोर धरत आहे.वैद्यकीय प्रवेशातील ७०/ ३० या प्रादेशिक आरक्षणामुळे होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. हा अन्याय दूर व्हावा म्हणून बीडसह मराठवाड्यातून पालक व शिक्षणप्रेमी एकवटले. आ. विनायक मेटे यांनी पालकांची बाजु ऐकून याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २८ मे रोजी मुंबईत भेट घेतली.मराठवाड्यातील ६०० तसेच विदर्भातील विद्यार्थी संख्या १२०० आहे. तर उर्वरित महाराष्टÑातील खाजगी व शासकीय वैद्यकीय २६ महाविद्यालयात विद्यार्थी संख्या ३३०० आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय होत असल्याची बाब निदर्शनास आणून हे प्रादेशिक आरक्षण रद्द करावे असे साकडे घातले होते. तर आ अमरसिंह पंडित यांनीही याप्रश्नी पाठपुरावा केला. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना निवेदनाद्वारे वस्तुस्थिती निदर्शनास आणून प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याची मागणी केली. माजलगाव येथील शिष्टमंडळाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना निवेदन दिले. जालना, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यातून या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यात आले. मात्र याबाबत अद्याप धोरणात्मक निर्णय झालेला नाही.कुठे बैठकीचा फार्स, तर कुठे पाठपुराव्यावर जोर : राज्यकर्त्यांचे दुर्लक्षबीडमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी शिक्षणप्रेमींची बैठक घेतली होती. त्यावेळी चर्चेनंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत पोकळे म्हणाले होते. मात्र या बैठकीला २५ दिवस झालेतरी पुढील हालचाली थंडावल्याने पालक व शिक्षणप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत.हे धोरण महाराष्टÑातच का?आरक्षण हे फक्त जातीनिहायच दिले जाते हे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केलेले आहे. मात्र फक्त महाराष्ट्रातच अशा प्रकारचे जातीनिहाय आरक्षण दिले जात आहे. आधीच मागास असलेल्या मराठवाडा आणि विदर्भावर हा एका प्रकारे अन्याय होत आहे.- आ. विनायक मेटे, बीडसमान संधीचे धोरण हवेप्रादेशिक आरक्षणाची ७०/३० पद्धत घटनाविरोधी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. प्रादेशिक आरक्षणाची पद्दत रद्द करुन राज्यात समान संधीचे धोरण लागू करुन मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करण्याची गरज आहे.- आ. अमरसिंह पंडित, बीड

टॅग्स :BeedबीडNEET Result 2018नीट परीक्षा निकाल २०१८Studentविद्यार्थीMarathwadaमराठवाडा