शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दिवसा घरात घुसून चोरी; पण पोलिसांच्या हाती लागेना संशयाची दोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

कडा : सध्या खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, शेतातील पिके खुरपणीला आल्याने लहान थोरांसह इतर मजूर घेऊन कुटुंबातील सदस्य ...

कडा : सध्या खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, शेतातील पिके खुरपणीला आल्याने लहान थोरांसह इतर मजूर घेऊन कुटुंबातील सदस्य शेतात जातात. मग हिच संधी साधून सराईत चोरटे बंद घराचे कुलूप तोडून भर दिवसा चोऱ्या करत असताना त्या संशयित चोरीची दोरी इतका सुगावा पोलिसाच्या हाती लागत नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

आष्टी तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिंचपूर येथील शरद गोंदावले याच्या घरी ७ जुलै रोजी घरी कोणी नसल्याची संधी साधून भरदिवसा घरात घुसून

घरातील पाच तोळे सोने व एक लाख साठ हजार रोख तर अंभोरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुंभेफळ येथे १९ जुलै रोजी भर दुपारी योगेश सुभाष गाडे याच्या घरी कोणी नसल्याचे पाहून आठ तोळे सोने व एक लाख रुपये रोख असा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे आठ दिवसांच्या फरकाने हे चोरीचे प्रकार घडल्याने व पोलिसांना अद्याप कसलाच मागमूस लागला नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

रात्री-अपरात्री नव्हे तर भरदिवसा चोरटे चोरी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करत असताना पोलिसांना चोर आव्हान देतात की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एवढे होऊनही भरदिवसा घरात घुसून चोरी होत असताना पोलिसांना थोडी देखील संशयाची दोरी हातात लागत नाही हे विशेष म्हणावे लागेल.

तालुक्यात आजवर अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्या चोरीचा तपास बोटावर मोजण्या इतकाच लागला आहे. आता तर भरदिवसा चोऱ्या होत असल्याने पोलिसांचा वचक आणि गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात यावे अशी मागणी शिवसंग्राम तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.

अन्य तीन ठिकाणीही चोऱ्या पण ठाण्यात तक्रार नाही.

याच आठवड्यात मेहकरी, सराटेवडगांव, टाकळी अमिया या ठिकाणी देखील दिवसाच चोऱ्या झाल्या आहेत. पण या लोकांनी संबंधित पोलीस ठाण्यात कसलीच तक्रार दाखल केली नाही. दिवसा घरफोडीचे सत्र कधी थांबणार व चोरटे पोलिसांना सापडतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, ठाणे हद्द परिसरात नाकाबंदी, गस्त, त्याचबरोबर कोम्बिग ऑपरेशन मोहीम हाती घेतली असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.