पेठ बीड हद्दीत सराफाचे दुकान पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST2021-05-30T04:26:45+5:302021-05-30T04:26:45+5:30

बीड : शहरातील पेठबीड भागातील हिरालाल चौकात एका सराफा दुकानाला आग लावल्याचा प्रकार २९ मे रोजी पहाटे पाच वाजेदरम्यान ...

A bullion shop was set on fire in Peth Beed area | पेठ बीड हद्दीत सराफाचे दुकान पेटविले

पेठ बीड हद्दीत सराफाचे दुकान पेटविले

बीड : शहरातील पेठबीड भागातील हिरालाल चौकात एका सराफा दुकानाला आग लावल्याचा प्रकार २९ मे रोजी पहाटे पाच वाजेदरम्यान घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुहास गणेशराव बेदरे यांचे हिरालाल चौक परिसरात सराफा दुकान आहे. शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास या दुकानाला आग लावण्यात आली. दुकानाच्या शटरने पेट घेतला. आगीचे लोळ पाहून नागरिकांनी धाव घेतली. त्याचवेळी पोलिसांची गाडी त्याठिकाणी आली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. आग वेळीच नियंत्रणात आल्यामुळे होणारे नुकसान टळले. जागेच्या वादातून ही आग लावल्याचा संशय व्यापाऱ्याने व्यक्त केला असून, एक व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आग लावताना दिसत आहे. पेठ बीड ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.

===Photopath===

290521\29_2_bed_11_29052021_14.jpeg

===Caption===

सीसीटीव्हीत कैद झालेला आरोपी 

Web Title: A bullion shop was set on fire in Peth Beed area