Beed: शेत तलावात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू; बीड जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:06 IST2025-12-01T13:05:56+5:302025-12-01T13:06:43+5:30

आष्टी तालुक्यातील टाकळसिंग गावातील घटना

Brother and sister drown in farm pond; Heartbreaking incident in Beed district | Beed: शेत तलावात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू; बीड जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

Beed: शेत तलावात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू; बीड जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

आष्टी : खेळत खेळत शेत तलावाजवळ गेलेल्या सख्ख्या बहीण-भावाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथे शनिवारी सकाळी सव्वाआठ वाजता घडली. श्रावण रोहिदास चव्हाण (वय ८) व श्रावणी रोहिदास चव्हाण (वय १०) (मूळ रा. कुसवडगाव, ता. जामखेड, जि. नगर) अशी मयत भावंडांची नावे आहेत.

जामखेड तालुक्यातील कुसवडगाव येथील मजूर रोहिदास चव्हाण (वय ३५) हे सध्या मजुरी करण्यासाठी आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथे कुटुंबासह आलेले असून, याच ठिकाणी राहात आहेत. त्यांचा मुलगा श्रावण रोहिदास चव्हाण व मुलगी श्रावणी रोहिदास चव्हाण हे दोघे बहीण-भाऊ २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:१५ वाजता खेळत खेळत शेतकरी शिवाजी दौंडे यांच्या शेतात गेले. यावेळी शेत तलावात पाय घसरून पडल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हिंगे हे करत आहेत.

Web Title : बीड जिले में खेत तालाब में डूबने से भाई-बहन की मौत

Web Summary : आष्टी, बीड के टाकल्सिंग में खेत तालाब में खेलते समय दो सगे भाई-बहन डूब गए। कुसवडगांव के श्रावण (8) और श्रावणी (10) की पानी में डूबने से मौत हो गई। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Sibling dies by drowning in farm pond in Beed district.

Web Summary : In a tragic incident in Takalsing, Beed, two siblings drowned in a farm pond while playing. Shravan (8) and Shravani (10), originally from Kuswadgaon, fell into the pond. Police are investigating the accidental deaths.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.