शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थी आले, बसले अन् लस नसल्याने निघून गेले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:33 IST

बीड : जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. शनिवारी तर लसच उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना तासन्‌तास ...

बीड : जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. शनिवारी तर लसच उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना तासन्‌तास बसून रिकाम्या हाताने परतावे लागले. जास्त त्रास हा ज्येष्ठांना सहन करावा लागला. आता आरोग्य विभागाला ६ हजार डोस आणखी मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाला; परंतु मनातील गैरसमज दूर झाल्यानंतर नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. मागील आठवड्यापासून तर केंद्रावर रांगा लागत आहेत. शुक्रवारी थोड्याफार प्रमाणात लस मिळाली; परंतु शनिवारी बहुतांश केंद्रांवर लसच उपलब्ध नव्हती. जिल्हा रुग्णालयातही केवळ कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. कोविशिल्ड लसीचा तुटवडा कायम होता. कोव्हॅक्सिन ही लस केवळ दुसरा डोस असणाऱ्यांना देण्यात येत होती.

दरम्यान, लसीच्या तुटवड्याबद्दल माहिती नसल्याने ज्येष्ठांनी सकाळपासूनच केंद्रावर गर्दी केली होती. लस येईल या अपेक्षेने ते तासन्‌तास बसले होते; परंतु लस न मिळाल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. दिवसभर लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. लस उपलब्ध करण्याची मागणी सामान्यांमधून होत आहे.

आज येणार सहा हजार डोस

राज्यातील ज्या जिल्ह्यात लस शिल्लक आहे, ती इतरांना देण्यात येत आहे. त्याप्रमाणे रविवारी जिल्ह्यात कोविशिल्डचे ६ हजार डोस येणार आहेत. ते आणण्यासाठी पुण्याला गाडी गेली असल्याचे सांगण्यात आले, तसेच १५ एप्रिल रोजी राज्याला जवळपास ७ लाख डोस मिळणार आहेत. त्यापैकी जिल्ह्याला किती मिळतात, याची प्रतीक्षा आहे.

शनिवारी लस संपली होती. कोविशिल्डचे आणखी सहा हजार डोस येणार आहेत. सध्या लसीचा तुटवडा जाणवत आहे. १५ एप्रिलला आणखी डोस मिळतील, अशी अपेक्षा आहे. आमच्याकडून पाठपुरावा सुरूच आहे.

-डॉ. संजय कदम, नोडल ऑफिसर, बीड