बीड जिल्हा हादरला! ७७ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार करून बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 14:50 IST2022-12-29T14:49:54+5:302022-12-29T14:50:42+5:30
पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरु आहे

बीड जिल्हा हादरला! ७७ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार करून बेदम मारहाण
गेवराई (बीड) : शहरातील मुख्यरस्त्याच्या बाजूला ७७ वर्षीय वृद्ध महिलेवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. आरोपीने मारहाण केल्याने पीडिता गंभीर जखमी आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
औरंगाबादकडे जाणाऱ्या मुख्यरस्त्यावर एक ७० वर्षीय वृद्ध महिला फळविक्रीकरून उदरनिर्वाह करते. तसेच रस्त्याच्या बाजूलाच आडोस्यात ती राहते. याच संधीचा फायदा घेऊन आज पहाटे ३ वाजेच्या दरम्यान एका नराधमाने वृद्ध महिलेवर लैगिंक अत्याचार केला. तसेच आरोपीने पिडीतेला जबर मारहाण केली. पिडीतेने आरडाओरडा केल्याने नागरिकांनी तिकडे धाव घेतली. अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार झाला. दरम्यान, नागरिकांनी पोलिसांना याची माहिती देत पिडीतेला गंभीर जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
आरोपी ताब्यात
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाच्या बाजूच्या दुकानातील सीसीटीव्हीच्या फुटेजवरून आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीस ताब्यात घेतले. ज्ञानेश्वर लक्ष्मण घुंगार्डे ( ३१, घुंगार्डे गल्ली,गेवराई) असे आरोपीचे नाव आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार, सहायक पोलिस निरीक्षक संतोष जंजाळ, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर यांनी पाहणी केली.