'चिठ्ठी नाही घेतली तर तुला जिवे मारीन अन् मी पण मरीन', अल्पवयीन मुलीचा मंदिरामध्ये विनयभंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 19:48 IST2026-03-25T19:46:53+5:302026-03-25T19:48:03+5:30

बीड जिल्ह्यातील आष्टीतील मंदिरातून अल्पवयीन मुलीला धमकी, वडिलांची नजर चुकवून नराधमाचा प्रताप

Beed Crime: Minor Girl Molested in Mahadev Temple in Ashti; Youth Arrested for Threatening Life and Suicide over Love Letter | 'चिठ्ठी नाही घेतली तर तुला जिवे मारीन अन् मी पण मरीन', अल्पवयीन मुलीचा मंदिरामध्ये विनयभंग!

'चिठ्ठी नाही घेतली तर तुला जिवे मारीन अन् मी पण मरीन', अल्पवयीन मुलीचा मंदिरामध्ये विनयभंग!

कडा (जि. बीड): आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महादेव मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला चिठ्ठी देण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. "जर चिठ्ठी घेतली नाही, तर तुला जिवे मारीन आणि मी पण आत्महत्या करेन," अशी धमकी देत आरोपीने मंदिरातच दहशत निर्माण केली. याप्रकरणी आष्टी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

वडिलांची नजर चुकवून नराधमाचा प्रताप
२४ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका गावातील मंदिरात ही घटना घडली. पीडित मुलगी आपल्या वडिलांसोबत दर्शनासाठी आली होती. तिचे वडील दर्शनानंतर इतरत्र गेल्याचे पाहून गावातीलच एका नराधमाने संधी साधली. त्याने मुलीचा हात धरून तिला "तू मला आवडतेस, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही" असे म्हणत चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला.

धमकीमुळे अल्पवयीन मुलगी भयभित
मुलीने चिठ्ठी घेण्यास नकार दिला असता, आरोपीने तिला जिवे मारण्याची आणि स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली. मुलीच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात मंगळवारी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title: Beed Crime: Minor Girl Molested in Mahadev Temple in Ashti; Youth Arrested for Threatening Life and Suicide over Love Letter