केज हादरले! सख्या चुलत्याने केला अत्याचार; विष प्राशन केलेल्या १६ वर्षीय पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 14:55 IST2026-04-11T14:50:33+5:302026-04-11T14:55:01+5:30
अत्याचारानंतर पीडितेचे टोकाचे पाऊल; केज पोलिसांनी नराधम चुलत्याला आवळल्या मुसक्या, दुसरा आरोपी फरार

केज हादरले! सख्या चुलत्याने केला अत्याचार; विष प्राशन केलेल्या १६ वर्षीय पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू
मधुकर सिरसट
केज ( बीड) : तालुक्यातील एका खेडे गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवरतीच्या सख्या चुलत्यानेच बळजबरीने अत्याचार केल्या नंतर आत्महतयेचा प्रयत्न केलेल्या पीडितेचा उपचारा दरम्यान शुक्रवारी स्वाराती रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आसून या घटनेमुळे केज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
केज तालुक्यातील बालाघाट च्या डोंगरी भागातील एका खेड्यातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान गाईच्या गोट्यातून आपल्या घरी जाणाऱ्या पुतणीला जवळच असलेल्या बाजावर पाडून तीच्या सख्या चुलत्यानेच तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची संताप जनक घटना घडली होती.
त्यानंतर त्या अल्पवयीन पीडित मुलीने ने विषारी औषध पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. चिंताजनक परिस्थिती असल्यामुळे पुढील उपचारासाठी पीडितेला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते . दरम्यान शुक्रवारी या पीडितेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली.
नराधम चुलता जेरबंद
या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आसून . दुसरा आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आसल्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी संगितले.