पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 5 तरुणांना एसटी बसने चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 12:56 IST2025-01-19T12:55:36+5:302025-01-19T12:56:14+5:30

बीड-परळी मार्गावर घडली दुर्दैवी घटना, पहाटे व्यायाम करण्यासाठी गेले होते.

Beed Accident, 5 youths preparing for police recruitment crushed by ST bus, three died on the spot | पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 5 तरुणांना एसटी बसने चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 5 तरुणांना एसटी बसने चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

Beed Accident: एसटी महामंडळाच्या बसने पाच तरुणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड-परळी रस्त्यावर असलेल्या घोडका राजुरी फाट्याजवळ हा अपघात घडला. अपघातात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  दररोजप्रमाणे आजही पहाटे सर्वजण व्यायामासाठी रस्त्यावर गेले होते.

सविस्तर माहिती अशी की, पोलीस भरतीची तयारी करणारे 5 तरुण आज (19 जानेवारी) सकाळी बीड-परळी रस्त्यावर व्यायामासाठी गेले होते. यादरम्यान एका भरधाव एसटी बसने त्यांना चिरडले. या दुर्दैवी घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे.

पोलीस बनण्याचे स्वप्न भंगले
या घटनेत बालाजी मोरे, ओम घोडके, आणि विराज घोडके, अशी मृत तरुणांची नावे आहेत. तरुणांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. 

Web Title: Beed Accident, 5 youths preparing for police recruitment crushed by ST bus, three died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.