शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

जंतनाशक गोळी खाल्यानंतर चिमुकली बेशुद्ध पडली; उपचारादरम्यान झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 18:19 IST

Baby girl fell unconscious after taking the deworming pill शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच कारण स्पष्ट होईल अशी आरोग्य विभागाची माहिती 

कडा : जंतनाशक गोळी खाल्यानंतर अचानक बेशुद्ध झालेल्या एका २२ महिन्यांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील  लोणी सय्यद मीर या गावात सोमवारी घडली. प्रांजल अंकुश रक्ताटे असे मृत चिमुकलीचे नाव आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळेल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन मोरे यांनी दिली.

प्रांजलचे काका भाऊसाहेब रक्ताटे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,' लोणी सय्यद मीर या गावात जिल्हा आरोग्य यंत्रणेचे उपकेंद्र आहे. ते बंद असल्याने जंतनाशक गोळ्या गावातील मारूती मंदिरात आशासेविकांच्या माध्यमातून वाटण्यात आल्या. मुलांच्या पालकांच्या हाती गोळ्या देऊन घरी गेल्यावर मुलांना द्या, असे सांगण्यात आले. परंतु, या गोळ्या कशा घ्यायचे हे सांगण्यात आले नाही. गोळ्या घरी घेऊन आल्यावर प्रांजल हिला पूर्ण गोळीतील अर्धी गोळी दिली. गोळी खाल्यानंतर ती लागलीच जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला गावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.'

याबाबत आष्टी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन मोरे म्हणाले,'जंतनाशक गोळ्या वितरणाची मोहीम एक मार्चपासून सुरू आहे. गावात अशाप्रकारे कोणालाही त्रास झालेला नाही. गावात राहिलेल्या मुलांसाठी गोळ्यांचे वितरण केले. जंतनाशक गोळ्यांनी मृत्यू होत नाही  शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच नेमके कारण स्पष्ट होईल. 

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडHealthआरोग्य