केज तालुक्यात विवाहितेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST2021-05-31T04:25:14+5:302021-05-31T04:25:14+5:30

केज तालुक्यातील २५ वर्षीय विवाहित महिला घरासमोरील अंगणात झोपलेली असताना तिच्या चुलत दिराने दीड महिन्यापूर्वी घराच्या बाजूला ओढत नेत ...

Atrocities on married women in Cage taluka | केज तालुक्यात विवाहितेवर अत्याचार

केज तालुक्यात विवाहितेवर अत्याचार

केज तालुक्यातील २५ वर्षीय विवाहित महिला घरासमोरील अंगणात झोपलेली असताना तिच्या चुलत दिराने दीड महिन्यापूर्वी घराच्या बाजूला ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. तिला चाकूचा धाक दाखवून हा प्रकार कोणास सांगितला तर तुझी ‘व्हिडिओ शूटिंग’ नातेवाइकांना दाखविण्याची धमकी दिली. घडलेला प्रकार पीडितेने पतीस सांगितला असता, त्यास तिच्या पतीने २९ मे रोजी सकाळी ७ वाजता जाब विचारला असता त्याने त्यास शिवीगाळ करीत पीडितेस पोलिसात गेल्यास पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी केज पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे करीत आहेत.

Web Title: Atrocities on married women in Cage taluka