चंदनाची झाडे जाळून प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:35 IST2021-04-09T04:35:09+5:302021-04-09T04:35:09+5:30

शेषराव अंतराम फड यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीतील प्रमुख व ...

Assault by burning sandalwood trees | चंदनाची झाडे जाळून प्राणघातक हल्ला

चंदनाची झाडे जाळून प्राणघातक हल्ला

शेषराव अंतराम फड यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीतील प्रमुख व त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून त्यांना व त्यांच्या मुलाला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यात मुलगा पवन फड याच्या हाताची बोटे फ्रॅक्चर झाली असून त्याच्या हाताला सात ते आठ टाके पडले आहेत.

परळी ग्रामीण पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र, आरोपीवर कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे व पोलिसांनी अद्यापही घटनास्थळाचा पंचनामा न केल्यामुळे शेषराव फड यांनी वरिष्ठांना निवेदन देऊन कळविले आहे . या प्रकरणी तत्काळ पंचनामा करून आरोपीवर तत्काळ कारवाई करून न्याय देण्याची विनंती केली आहे. न्याय न मिळाल्यास १ मे रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा शेषराव फड यांनी दिला आहे.

Web Title: Assault by burning sandalwood trees