जिल्ह्यातील सर्व शिवालये महाशिवरात्रीला दर्शनासाठी पूर्णतः बंद : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:31 AM2021-03-08T04:31:32+5:302021-03-08T04:31:32+5:30

सदरील कालावधीत फक्त पुजारी व विश्वस्त यांना कोरोनाविषयक जे नियम आहेत, त्यांचे पालन करून प्रथेप्रमाणे पूजा व इतर ...

All Shivalayas in the district are completely closed for Darshan on Mahashivaratri: Collector | जिल्ह्यातील सर्व शिवालये महाशिवरात्रीला दर्शनासाठी पूर्णतः बंद : जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील सर्व शिवालये महाशिवरात्रीला दर्शनासाठी पूर्णतः बंद : जिल्हाधिकारी

googlenewsNext

सदरील कालावधीत फक्त पुजारी व विश्वस्त यांना कोरोनाविषयक जे नियम आहेत, त्यांचे पालन करून प्रथेप्रमाणे पूजा व इतर बाबी करण्यास परवानगी असेल. परंतु, भाविक-भक्त यांना दर्शनासाठी पूर्णत: बंद असणार आहे.

या आदेशांचे पालन न करणा-या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर 'भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम १८९७ दिनांक, १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्यानुसार, जिल्हाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कोविड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Web Title: All Shivalayas in the district are completely closed for Darshan on Mahashivaratri: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.