रेल्वे भूसंपादनातील भ्रष्टाचार तक्रारी प्रकरणी प्रशासनाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:28 AM2019-07-01T00:28:30+5:302019-07-01T00:29:11+5:30

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पदभार स्विकारल्यापासून अनेक विषयांमुळे जिल्हा प्रशासन चर्चेत आहे. सुरुवातीला छावणी, टँकर, वाळू साठ्यावरील कारवाई केल्यानंतर आता जिल्हा प्रशासाने आपला मोर्चा बीड-नगर-परळी रेल्वे मार्गातील भूसंपादनातील भ्रष्टाचाराकडे वळवला आहे.

Administration meeting in case of corruption complaints in Railway Land Acquisition | रेल्वे भूसंपादनातील भ्रष्टाचार तक्रारी प्रकरणी प्रशासनाची बैठक

रेल्वे भूसंपादनातील भ्रष्टाचार तक्रारी प्रकरणी प्रशासनाची बैठक

Next
ठळक मुद्देउद्या बैठक : भूसंपादनातील चौकशीनंतर अनेक प्रकरणे होणार उघड

बीड : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पदभार स्विकारल्यापासून अनेक विषयांमुळे जिल्हा प्रशासन चर्चेत आहे. सुरुवातीला छावणी, टँकर, वाळू साठ्यावरील कारवाई केल्यानंतर आता जिल्हा प्रशासाने आपला मोर्चा बीड-नगर-परळी रेल्वे मार्गातील भूसंपादनातील भ्रष्टाचाराकडे वळवला आहे. मंगळवारी यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे.
बीड- नगर -परळी रेल्वे मागार्साठी बीड जिल्ह्यात नियम डावलून आणि अनावश्यक भूसंपादन झाल्याच्या आणि यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करुन मोठ्या प्रमाणवर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. याचा निवाडा व्हावा व ज्या नागरिकांची किंवा शेतकºयाची शेती या कामासाठी संपादीत झाली आहे त्यांना मावेजा मिळावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
जिल्ह्यातील भूसंपादनाचा विषय व त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार उघड झाला तर यामध्ये अनेक अधिकारी व बडे मासे गळाला लागणार आहेत. प्राशासनाकडून चौकशी सुरु करण्यात येणार असल्यामुळे विस्मृतीत गेलेले भूसंपादनाची प्रकरणे पुन्हा एकदा चर्चेत येणार आहेत.
बीडच्या पालवन परिसरात रेल्वेसाठी करण्यात आलेले अतिरिक्त भूसंपादन हा विषय वादात आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही भूसंपादन प्रक्रिया रद्द केली होती. मात्र अजूनही तो विषय संपलेला नाही. एम. डी . सिंह जिल्हाधिकारी असतानाही भूसंपादनासाठी अनेकजण आग्रही होते. मात्र एम.डी.सिंह यांनी देखील याविषयी कार्यवाही केली नव्हती. त्यानंतर अनेक ठिकाणी भूसंपादन करताना नियम डावलल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या, या तक्रारींच्या चौकशीसाठी अप्पर जिल्हाधिकारी बीड यांच्या दालनात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Web Title: Administration meeting in case of corruption complaints in Railway Land Acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.