शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 15:08 IST

बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळ्याव्याला मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. यावेळी आमदार धनंजय मुंडेही उपस्थित होते.

बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळ्याव्याला मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. यावेळी आमदार धनंजय मुंडेही उपस्थित होते, यावेळी त्यांनी भाषणात शायरी बोलून दाखवली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाचा उल्लेख केला. तसेच मंत्रि‍पदाची खंतही बोलून दाखवली.

"शेतकरी अडचणीत आहे, इथे आलेला प्रत्येकजण शेतकरी आहे, आज मी मंत्रीमंडळात नाही, फक्त आमदार आहे. माझी बहिण मंत्रीमंडळात आहे, शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत पंकजा मुंडेंनी मिळून दिल्याशिवाय राहणार नाही", असे धनंजय मुंडे म्हणाले. आजच्या पंकजाताईंनी सुरू केलेल्या दसऱ्या अभुतपूर्व गर्दी आज झाली आहे. पंकजा मुंडेंनी त्यांच्या भाषणात उल्लेख करावा की आजपर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांचा आजपर्यंतचा सर्वात अभूतपूर्व मेळावा कोणता असेल तर तो आजचा मेळावा आहे. आपण एवढे प्रेम मुंडे कुटूंबावर दाखवले नतमस्तक होऊन प्रणाम करतो. पाऊस आला, पूर आला भयंकर शेतकऱ्यांसमोर संकट आले, तसले संकट असताना माझी आणि ताईंची चर्चा झाली आपण काय करावे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. 

कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर

शायरीतून सगळेच बोलून दाखवले

"मला माझ्या बहिणींचा अभिमान वाटतो, साहेब गेल्यानंतर सुध्दा असंख्य अडचणीत सुध्दा पंकजाताईंनी सार्थ परंपरा पुढे ठेवली. मी देवाण-घेवाण बघत असताना पुढे आलो, मागे बघितले, मागच्या दसऱ्याला मी होतो, त्यातले अनेकजण मागे दिसतात. त्यांना वाटत पुढे निवडणूका नाहीत. काहीजण म्हणले, मुंडे साहेबांचे सगळे संपले, असे म्हणत मैने सोचा की इस सफर करते हूए खामोश रहाना सही हैं...कुछ भी नहीं करता बहोत गालीयां खाई हैं, असेही धनंजय मुंडे म्हणाले. 

यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी शायरीतून सगळेच बोलून दाखवले. "आग लगी थी मेरे घर,सब पुछने वाले आये हाल पूछा और चले गये. एक सच्चे मित्र ने पूछा क्या बचा है? मैने कहाँ कुछ नहीं केवल मैं बचा गया हूँ. फिर उसने गले लगा कर कहाँ दोस्त.फिर जला ही क्या हैं?, अशी शायरी मुंडे बोलले.

'मराठा आरक्षण दिल्याने आनंद'

ज्यावेळी आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळी मी प्रत्येकवेळी भांडलो आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले याचा आम्हाला आनंद आहे. मीही त्या चळवळीत होतो. काहींना मराठा आरक्षणाच्या आडून ओबीसींचे आरक्षण घ्यायचे आहे, ओबीसींचे  कटऑफ ४८५ आणि स्पेशल विकर सेशनचा कट ऑफ ४५० मार्क आहेत. मी जर मराठा समाज म्हणून ईडब्लूसच आरक्षण घेतलं, तर पास झालो असतो. प्रमाणपत्र घेवून ४८० मार्क घेऊन सुध्दा नापास, कुणाला फसवताय. काही ठरावीक लोक खुर्ची मिळावी म्हणून, राजकारण करत आहेत, असंही मुंडे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhananjay Munde expresses feelings through poetry, regrets not being minister.

Web Summary : Dhananjay Munde spoke at Pankaja Munde's Dussehra rally, expressing feelings via poetry. He mentioned Maratha and OBC reservations and voiced regret about not being a minister, while assuring help to farmers.
टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा