पावणे चार कोटींच्या रस्त्याची हाताने निघते खडी; कडा-शिरापूर रस्त्याचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 12:02 PM2023-12-20T12:02:55+5:302023-12-20T12:05:18+5:30

रस्त्याची खडी हाताने अलगद उखडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी काम बंद पाडले आहे. 

3.73 Crores of road stones is removed by hand; Villagers stopped the work of Kada-Shirapur road | पावणे चार कोटींच्या रस्त्याची हाताने निघते खडी; कडा-शिरापूर रस्त्याचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले

पावणे चार कोटींच्या रस्त्याची हाताने निघते खडी; कडा-शिरापूर रस्त्याचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले

- नितीन कांबळे
कडा (बीड) :
अंत्यत खराब असलेल्या कडा ते शिरापूर रस्ता कामाला अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सुरुवात झाली.मात्र, ठेकेदाराकडून या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याची खडी हाताने अलगद उखडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी काम बंद पाडले आहे. 

आष्टी तालुक्यातील कडा ते शिरापूर हा पाच किलोमीटर अंतराचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब झाला होता.मेहकरी, पिंपळगांव दाणी, निमगांव बोडखा, वाहीरा अशा सात गावाला जोडणारा हा रस्ता आहे. ग्रामस्थांना दळणवळण करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागत होता. दरम्यान, आ.सुरेश धस याच्या पाठपुराव्यानंतर ३ कोटी ७३ लाखाच्या या रस्ता कामाला सुरुवात झाली.मात्र, सदरील ठेकेदाराकडून निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.  हाताने अलगद रस्ता उखडत असल्याने ग्रामस्थांकडून हे काम बंद पाडण्यात आले आहे.उत्कृष्ट दर्जाचे काम होत असेल तरच कामाला सुरुवात करा नसता काम बंद ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

यावेळी टाकळी गावचे सरपंच सावता ससाणे, ग्रा.पं.सदस्य गौतम कर्डीले, शंकर कर्डिले, बाळासाहेब कर्डीले, रजणीकांत कर्डिले, कृष्णा गलांडे, बंडु साके, सागर कर्डीले, साके महाराज, सतिष भालेराव, रघूनाथ कर्डिले, देविदास कर्डिले, रणजित कर्डिले आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: 3.73 Crores of road stones is removed by hand; Villagers stopped the work of Kada-Shirapur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.