गढी येथील जवाहर नवोदय विद्यालयातील २० जण कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:32 IST2021-03-06T04:32:03+5:302021-03-06T04:32:03+5:30

या विद्यालयातील एका सहशिक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर विद्यालय प्रशासनाने शाळेतील सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची ॲण्टीजेन तपासणी करून ...

20 students of Jawahar Navodaya Vidyalaya at Gadhi are coronated | गढी येथील जवाहर नवोदय विद्यालयातील २० जण कोरोनाबाधित

गढी येथील जवाहर नवोदय विद्यालयातील २० जण कोरोनाबाधित

या विद्यालयातील एका सहशिक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर विद्यालय प्रशासनाने शाळेतील सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची ॲण्टीजेन तपासणी करून घेतली. त्यातून ५ मार्च रोजी तब्बल १२ विद्यार्थी व आठ शिक्षक, कर्मचारी, कुटुंबीय कोरोनाबाधित झाल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली.

बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता कोरोना हॉटस्पॉट होताना दिसत आहे. राज्याच्या अनेक भागांत निवासी शाळा आणि वसतिगृहामधून विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे चित्र असतानाच आता गढी येथील नवोदय विद्यालयातदेखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी येथील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यात २० जण कोरोनाबाधित सापडल्याचे तहसीलदार सचिन खाडे यांनी सांगितले. सदर विद्यालयाचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येणार असून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे. मास्कचा वापर करावा, असे आवाहन खाडे यांनी केले आहे.

Web Title: 20 students of Jawahar Navodaya Vidyalaya at Gadhi are coronated