१३८ जण कोरोनामुक्त, १५९ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST2021-07-05T04:21:35+5:302021-07-05T04:21:35+5:30

बीड : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे १५९ नवे रुग्ण आढळले. तर १३८ जणांनी कोरोनावर मात केली त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात ...

138 corona free, 159 new patients | १३८ जण कोरोनामुक्त, १५९ नवे रुग्ण

१३८ जण कोरोनामुक्त, १५९ नवे रुग्ण

बीड : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे १५९ नवे रुग्ण आढळले. तर १३८ जणांनी कोरोनावर मात केली त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ९२ हजार ५१९ इतकी झाली आहे. मागील २४ तासात कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात ३ हजार ८७० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात ३ हजार ७११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १५९ जणांचे अहवाल बाधित आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात २, आष्टी तालुक्यात २४, बीड तालुक्यात २८, धारुरमध्ये २१, गेवराईत १४, केजमध्ये ७, माजलगावात ४, परळीत २, पाटोद्यात ४१, शिरुरमध्ये ८ आणि वडवणीत ८ नवे रुग्ण आढळून आले. सध्या जिल्ह्यात १ हजार २७ जण उपचाराखाली आहेत.

जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी मृत्यूसत्र रोखण्याचे आरोग्य विभागापुढे आव्हान कायम आहे. रविवारी जुने २ तर मागील २४ तासातील सहा जणांचे मृत्यू नोंदवले गेले. यामध्ये, केज तालुक्यातील कदमवाडी येथील ५१ वर्षीय पुरुष, बीड शहरातील ६२ वर्षीय पुरुष, परळी तालुक्यातील चिकाणीतांडा येथील ७० वर्षीय पुरुष, केज तालुक्यातील पिंपरी येथील ५० वर्षीय पुरुष, बीड तालुक्यातील बेलखंडी येथील ६० वर्षीय महिला आणि अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील ४७ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा ९२ हजार ५१९ इतका झाला आहे. तर बरे झालेल्यांची संख्या ८८ हजार ९५२ झाली आहे. आतापर्यंत २ हजार ५४० जणांचा बळी गेला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

----------

Web Title: 138 corona free, 159 new patients