शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
6
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
7
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
8
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
9
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
10
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
11
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
12
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
13
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
14
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
15
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
19
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
20
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हालाही दाढी केल्यानंतर जळजळ आणि खाज येते? 'या' ५ उपायांनी समस्या होईल कायमची दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 14:52 IST

घरच्याघरी दाढी केल्यानंतर त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जोपर्यंत तुम्ही योग्य पद्धतीनं दाढी करत नाही किंवा त्वचेची काळजी घेत नाही तोपर्यंत त्वचेचं नुकसान होणं थांबणार नाही.

कोरोनाच्या लॉकडाऊननंतर आता सलून पार्लर पुन्हा सुरू झाले असले तरी लोकांना दाढी करण्यासाठी किंवा केस कापण्यासाठी प्रत्येक आठवड्यात सलूनमध्ये जाण्याची भीती वाटते.  म्हणून लोक घरच्याघरी दाढी करत आहेत. घरच्याघरी दाढी केल्यानंतर त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जोपर्यंत तुम्ही योग्य पद्धतीनं दाढी करत नाही किंवा त्वचेची काळजी घेत नाही तोपर्यंत त्वचेचं नुकसान होणं थांबणार नाही. शिवाय पुळ्या येणं, खाज येणं,  लाल चट्टे येणं, रक्त येणं अशा समस्या उद्भवतात. 

या चूकांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असू शकतो. दाढीसाठी फोम व्यवस्थित तयार करणं, जुन्या ब्लेडचा वापर  करणं, लोशनचा वापर न करणं, क्लोज शेवसाठी जास्त दबाव टाकाणं यांचा समावेश आहे. रेजरचा वापर करताना तुम्ही सावधगिरी बाळगली नाही जखम होण्याची शक्यता असते. ही जखम बरी होण्यासाठी बराच वेळ लागतो. तोपर्यंत चेहरा खराब दिसू शकतो. रेजरचा वापर जास्त वेदनादायक असल्यामुळे त्वचेची जळजळ होण्याची शक्यता असते. म्हणून दाढी केल्यानंतर  होणारी जळजळ दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला खास उपाय सांगणार आहोत. 

एलोवेरा जेल

एलोवेरा जेल रेजर बर्नच्या समस्येसाठी फायदेशीर ठरते. रेजरच्या वापरामुळे येणारी खाज खुजली दूर करण्यासाठी आणि जखमेचे व्रण घालवण्यासाठी एलोवेरा जेल फायदेशीर ठरते. त्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते.  एलोवेरात अनेक एंटीबॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे स्किन इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. 

बर्फाच्या तुकड्यानं मसाज करा

दाढी करताना ब्लेड लागल्यानंतर खाज येते किंवा रक्तस्त्राव होतो. अशावेळी दाढी केल्यानंतर बर्फाच्या तुकड्यानं मसाज केल्यास त्वचेला ग्लो येऊन त्वचा चांगली राहते. याशिवाय नारळाच्या तेलानेही तुम्ही मसाज करू शकता. नारळाचं तेल  एंटीसेप्टिक असून त्वचेसाठी नुकसानकारक ठरणारे बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी फायदेशी ठरते. त्यामुळे त्वचेला पोषण मिळते.

टी बॅग्स

चहाच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्व आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. त्यामुळे त्वचेच्या सगळ्या समस्या दूर करता येऊ शकतात. चहाच्या पानांमध्ये एंटी फंगल आणि एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे जखम भरण्यास मदत होते. टी बॅग २ किंवा ३ दिवसांपेक्षा जूनी वापरू नका. टी बॅग्स त्वचेवर लावण्याासाठी थंड पाण्याचा वापर करा. थंड पाण्याने धूवुन जखम झालेल्या ठिकाणी लावा. ही क्रिया दोन दिवस केल्यानं रेजर बर्नची समस्या लगेचच दूर होईल.

हे पण वाचा-

... म्हणून तुमच्या दाढीचा लूक बिघडतो; 'या' टीप्स वापरून मिळवा हॅण्डसम लूक  

'या' चुकांमुळे शेविंगनंतर त्वचेवर बारीक दाणे येतात, हॅण्डसम लूकसाठी वापरा 'हा' खास फंडा

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्स