शरीराला मिळावीत खनिजे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 05:55 IST2016-03-06T12:55:27+5:302016-03-06T05:55:27+5:30

फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. 

The minerals found in the body ... | शरीराला मिळावीत खनिजे...

शरीराला मिळावीत खनिजे...

ong>निसर्गात 24 प्रकारची खनिजे असून त्यातली सात खनिजे ही अनिवार्य असतात आणि ती फळं, भाजी, धान्य, दूध आणि पाणी या नैसर्गिक गोष्टींमधून मिळतात. खाद्यपदार्थामधील खनिजे शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे.

- फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.

-  डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.

-  काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.

-  दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.

-  फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.

Web Title: The minerals found in the body ...