लूक बिघवणाऱ्या डेड सेल्सना चेहऱ्यावरून कसं घालवाल? घरच्याघरी तांदळाच्या पाण्याने समस्या होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 04:10 PM2020-12-22T16:10:01+5:302020-12-22T16:24:20+5:30

Beauty Tips in Marathi : अनेक लोक त्वचेवर ग्लो मिळवण्यासाठी तसंच डेड सेल्सपासून मुक्तता मिळवण्यासाठी पार्लरमध्ये पैसे मोजून तासनंतास घालवतात.

Hundred percent natural and home made scrub to clean dead cells | लूक बिघवणाऱ्या डेड सेल्सना चेहऱ्यावरून कसं घालवाल? घरच्याघरी तांदळाच्या पाण्याने समस्या होईल दूर

लूक बिघवणाऱ्या डेड सेल्सना चेहऱ्यावरून कसं घालवाल? घरच्याघरी तांदळाच्या पाण्याने समस्या होईल दूर

Next

खूप कमी लोकांना माहीत असतं की, आपल्या शरीरावर रोज ४० हजारांपेक्षा जास्त मृतपेशी तयार होतात. यांनाच डेड सेल्स असं म्हणतात. या डेड सेल्सना दूर केलं नाही तर इतर पेशींना योग्य प्रमाणात श्वास घेता येत नाही. त्यामुळे त्वचा निस्तेज दिसते.  तुमचा विश्वास बसणार नाही पण या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तांदळाचे पाणी फायदेशीर ठरते. अनेक लोक त्वचेवर ग्लो मिळवण्यासाठी तसंच डेड सेल्सपासून मुक्तता मिळवण्यासाठी पार्लरमध्ये पैसे मोजून तासनंतास घालवतात. त्यापेक्षा  घरच्याघरी तांदळाच्या चुऱ्याचे पाणी लावून तुम्ही ग्लोईंग त्वचा मिळवू  शकता.

डेड सेल्स का तयार होतात 

माणसाचे शरीर बाहेरून जितके साामान्य दिसते. तितकंच आतल्या बाजूने गुंतागुंतीचे असते. शरीराच्या आत सुरू असलेल्या प्रक्रियांचा परिणाम पचनक्रियेवर होत असतो. खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर रस तयार होते. त्यानंतर या रस शोषला  जातो. या दरम्यान हानीकारक फ्री रेडिक्लस तयार होतात. त्यामुळे त्वचेच्या आतल्या पेशींना नुकसान पोहोचतं.

त्वचेच्या बाहेरील पेशी मेल्यानंतर गळून पडतात

प्रत्येक ३० दिवसांनी त्वचा पूर्णपणे बदलते. त्यानंतर त्वचा एकदम नवीन दिसू लागते. याचा अर्थ असा नाही की, संपूर्ण शरीरातील त्वचा एकत्र बदलते. ही प्रक्रिया रोज सुरू असते. यातूनच त्वचेतील टॉक्सिन्स बाहेर काढण्याचे काम सुरू असते. शरीरातील जास्तीत जास्त पेशी मृत झाल्यानंतर रोजच्या एक्टिव्हीज करणं कठीण होतं.  हात, पाय आणि पाठीच्या मृत पेशी अंघोळ करताना निघून जातात.

चेहरा आणि मानवरच्या मृतपेशी काढून टाकणं कठीण असतं. कारण चेहरा आणि मानेची त्वचा आणि शरीरातील इतर बॉडी पार्ट्सच्या तुलनेत  जास्त सौम्य असते. जर तुम्ही या अवयवांकडे लक्ष देत नसाल तर त्वचेचं नुकसानही होऊ शकतं. कारण चेहरा आणि मान नेहमी बाहेरील वातावरणाच्या थेट संपर्कात येत असतात.

तांदळाचे पाणी त्वचेवरील डेड सेल्स काढून टाकण्यासाठी फायदेशीर 

तांदळाचा चुरा तुमचा चेहरा आणि मानेवरील डेड सेल्स काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतो. तांदळात कॅल्शियम, व्हिटामीन डी कमी प्रमाणात असून फायबर्स मोठया प्रमाणात असतात. याशिवाय यात आर्यन, थायमीन यांसारखे तत्व असतात. तांदळाच्या सेवनाने जसे शरीराला पोषण मिळते. त्याचप्रमाणे तांदळाचा चुरा चेहरा चांगला ठेवण्यासाठी फायेदशीर ठरतो. हिवाळ्यात केसातील कोंडा वाढलाय? 'हे' ४ घरगुती उपाय वापराल; तर कोंडा कायमचा होईल दूर

असं करा तयार

तांदळाचा चुरा तयार करण्यासाठी ४ ते ५ चमचे तांदूळ घेऊन वाटून घ्या. त्यानंतर त्यात तेवढ्यात प्रमाणात दूध घालून जाडसर पेस्ट तयार करा. त्यानंतर या मिश्रणाचा स्क्रबरप्रमाणे वापर करा. चेहरा आणि मानेवर हलक्या हाताने मालिश करा. ३ ते ४ मिनिट मालिश केल्यानंतर हात  स्वच्छ धुवून टाका. हिवाळ्यात तुम्ही पाण्याचा जास्त वापर टाळत असाल तर सुती कापडाला ओला करून पिळून घ्या. त्यानंतर पाण्याने त्वचा साफ करा. त्यानंतर त्वचेवर मॉईश्चराईजरचा वापर करा. आठवड्यातून  ३ ते ४  वेळा या स्क्रबरचा वापर केल्यास फरक दिसून येईल. थंडीच्या दिवसात तोंडावर वाफ घेण्याचे 'हे' फायदे वाचाल; तर त्वचेसह आरोग्याच्या तक्रारी कायमच्या विसराल 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Hundred percent natural and home made scrub to clean dead cells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.