हिवाळ्यात केसातील कोंडा वाढलाय? 'हे' ४ घरगुती उपाय वापराल; तर कोंडा कायमचा होईल दूर

By Manali.bagul | Published: December 20, 2020 05:35 PM2020-12-20T17:35:50+5:302020-12-20T17:49:24+5:30

Beauty tips in Marathi : कोंडा जास्त झाला तर अनेकदा चांगल्या शॅम्पूने धुतलं तरी निघत नाही आज आम्ही तुम्हाला केसांतील कोंडा कसा दूर करायचा तसंच केस गळण्याच्या समस्येपासून कशी  सुटका मिळवायची याबाबत सांगणार आहोत. 

Easy and natural way to avoid dandruff problems in winter season | हिवाळ्यात केसातील कोंडा वाढलाय? 'हे' ४ घरगुती उपाय वापराल; तर कोंडा कायमचा होईल दूर

हिवाळ्यात केसातील कोंडा वाढलाय? 'हे' ४ घरगुती उपाय वापराल; तर कोंडा कायमचा होईल दूर

googlenewsNext

हिवाळा सुरू झाला असून आता हळूहळू वातावरणात  गारवा जाणवत आहे. थंडीच्या दिवसात सगळ्यात  कॉमन जाणवणारी समस्या म्हणजे केसांचा कोरडेपणा आणि कोंडा होणं. तुम्हाला कल्पना नसेल पण जास्त कोंडा असणं हीच बाब पुढे केसांच्या गळण्यासाठी कारणीभूत ठरते.  कारण कोंडा जास्त झाला तर अनेकदा चांगल्या शॅम्पूने धुतलं तरी निघत नाही आज आम्ही तुम्हाला केसांतील कोंडा कसा दूर करायचा तसंच केस गळण्याच्या समस्येपासून कशी  सुटका मिळवायची याबाबत सांगणार आहोत. 

तेलाने मालिश

आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांसाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करा. यामुळे स्काल्पचा ड्रायनेस दूर होईल आणि पोषक तत्व केसांसाठी फायदेशीर ठरतील. याशिवाय तुम्ही खोबरेल तेलाने सुद्धा मालिश करू शकता. मसाज केल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळतं परिणामी केस गळणं थांबतं.  तसंच  खोबऱ्याच्या तेलामध्ये टी-ट्री ऑइल एकत्र करा आणि स्काल्पला लावून मालिश करा. अर्धा तास किंवा संपूर्ण रात्र तसचं ठेवा. त्यानंतर केमिकल्स कमी असणाऱ्या शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ करा.

सोडा, लिंबू

एका बाउलमध्ये 3 चमचे बेकिंग सोडा पावडर घ्या. त्यामध्ये 3 चमचे लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्काल्पला लावा. हा उपाय केल्यानं स्काल्पवरील घाण दूर होण्यास तसंच केस मजबूत होण्यास मदत होईल.

लाकडी कंगवा

केसातील कोंडा कमी करण्यास लाकडी कंगव्याचा उपयोग होतो. लाकडी कंगव्यामुळे डोक्यावरील त्वचेमध्ये निर्माण होणारा तेलकटपणा कमी होतो. परिणामी कोंडा कमी होण्यास मदत होते.

रोज केस धुणं टाळा

हिवाळ्यात दररोज केस धुण्यास टाळा. दररोज केस धुण्यामुळे टाळूमध्ये असलेले नैसर्गिक तेल कोरडे होईल आणि यामुळे आपले केस ओलावाशिवाय निरोगी आणि निर्जीव दिसतील. कोरड्या केसांपासून मुक्त होण्यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुवा.

शक्यतो डोकं झाकून ठेवा

हिवाळ्याच्या महिन्यांत केस शक्य तितके झाकून ठेवा, अन्यथा केस कोरडे होऊ शकतात. आंबाडा किंवा वेणी घालून डोक्यावर स्कार्फ वापरा. दुपारी डोके आणि संपूर्ण शरीर सूर्यप्रकाशापासून वाचवता येईल. याची काळजी घ्या.

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)
 

Web Title: Easy and natural way to avoid dandruff problems in winter season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.