शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
4
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
5
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
6
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
7
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
8
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
9
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
10
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
11
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
12
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
13
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
14
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
15
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
16
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
17
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
18
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
19
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
20
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:29 IST

तुम्ही तरुण आणि उत्साही असलात आणि एनर्जी ड्रिंक घेत असलात तरी ते तुमच्या हृदयाला हानिकारक आहे.

तुम्ही तरुण आणि उत्साही असलात आणि एनर्जी ड्रिंक घेत असलात तरी ते तुमच्या हृदयाला हानिकारक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. एनर्जी ड्रिंकमुळे रक्तदाब, हृदयाचे ठोके आणि हृदयविकाराचा झटका येण्याची श्क्यता असते, असे एका अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे.
वयाने मोठी माणसे किंवा हृदयविकाराचा त्रास असणार्‍यांनाच याचा धोका असेल असा तुमचा समज असेल तर तेही चुकीचे आहे. कारण तरुण वयोगटातही हे हेल्थ ड्रिंक हार्मोन्स लेव्हलवर स्ट्रेस आणत असल्याचे आणि रक्तदाब वाढवित असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. एनर्जी ड्रिंक प्यायल्यानंतर रक्तदाब आणि हृद्याच्या ठोक्यांमध्ये होणारे बदल यांचा अभ्यास करण्यात आला. यासाठी ज्यांची चाचणी घेण्यात आली त्यांना काहीही न खाता पिता दरदिवशी अल्कोहोल किंवा कॅफिन देऊन त्यानंतर त्यांच्या शरीरातील बदल टिपण्यात येत होते. कॅफिन, प्लाजमा ग्लुकोज आणि नॅरोड्रनलाईन यांच्यातील सिरमची पातळी तपासण्यात आली. त्यानंतर ३0 मिनिटांनी एनर्जी ड्रिंक दिल्यानंतर रक्तदाब आणि हृदयाच्या ठोक्यांचे रिडिंग नोंदवण्यात आले. या अभ्यासाचा निष्कर्ष डोळे उघडवणारा होता.
प्लेसबो ड्रिंक घेतल्यानंतर कॅफिनची पातळी पूर्वीसारखीच होती मात्र एनर्जी ड्रिंक घेतल्यावर त्यात मोठय़ा प्रमाणात बदल आढळून आला. एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर रक्तदाब ६.२ ने वाढलेला दिसला. या एनर्जी ड्रिंकमधील कॅफीन आणि स्टिम्युलंटस हे यासाठी कारणीभूत आहेत. अधिक प्रमाणात असलेल्या कॅफीन आणि स्टिम्युलंटसमुळेच शरीरावर घातक परिणाम होत असल्याचे संशोधक व डॉक्टर यांनी सांगितले.