शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

​सेलिब्रिटींनाही ग्रासले ‘डेंग्यू’ने !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 16:02 IST

डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू विषाणूंमुळे होतो.

डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो.‘कहानी २’ची शूटिंग आटोपून विद्या बालन नुकतीच अमेरिकेतून मुंबईला परतली. मात्र तिला लगेच ‘डेग्यू’ची लागण झाली. विद्यावर घरीच उपचार सुरू  असून डॉक्टरांनी तिला १० दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.डेग्यूची लागण ही सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रू वस्तीत राहणा-या सेलिब्रिटींनाही होऊ शकते. आजच्या फीचरमधून आपण हेच जाणून घेणार आहोत की, आजपर्यंत कोणकोणत्या सेलिब्रिटींना डेंग्यूची लागण झाली आहे. * रणवीर सिंग - आॅक्टोबर २०१३ मध्ये कलकत्त्यातील दुर्गापूर परिसरात ‘गुंडे’ चित्रपटाची शूटिंग दरम्यान रणवीर सिंगला डेंगूची लागण झाली होती. त्याला तात्काळ मुंबई येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. * रिषी कपूर- गेल्यावर्षी रिषी कपूरलाही डेग्यूची लागण झाली होती. काही दिवसानंतर उपचार झाल्यावर रिषी कपूर बरा झाला होता. * लिजा हेडन- भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री लिजा हेडन हिलादेखील दोन वर्षापूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. अक्षय कुमार सोबतच्या ‘द शौकिन्स’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिला तीव्र ताप चढला होता. उपचारार्थ दाखल केले असता डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले होते. * पूजा हेगडे- मोहेंजोदडो चित्रपटाची नायिका पूजा हेगडे ही ह्याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तापाने फणफणली होती. तिच्यावर निदान केल्यावर तिला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. * निखिल चिनापा-सुप्रसिद्ध इंडियन रेडिओ आणि व्हिडिओ जॉकी निखिल चिनापा ह्याला आॅक्टोबर २०१५ मध्ये डेंग्यू झाला होता. शिलॉँगला एका डान्स प्रोग्रॅमसाठी जात असताना त्याला ही लागण झाली होती. काही दिवस त्याने तिथेच उपचार घेतले होते. * नवाजुद्दीन सिद्दिकी-अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीला आॅक्टोबर २०१५ मध्ये डेंग्यूने ग्रासले होते. सुरूवातीला त्याच्यावर व्हायरल फिवर आणि थ्रोट इन्फेक्शनवर उपचार करण्यात आले होते, मात्र तब्बेत अधिकच खालावल्याने विशेष निदान करण्यात आले व त्यात त्याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. * यश चोप्राने गमावला जीव-सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता यश चोप्राला डेंग्यूमुळे आपला जीव गमवावा लागला. २०१२ यावर्षी त्यांना डेंग्यूने ग्रासले. या आजारामुळे त्यांचे कित्येक अवयव निकामी झाले होते. त्यामुळे त्यांचे निधन झाले. ते त्यावेळी ८० वर्षाचे होते. सेलिब्रिटींच्या घरी सापडल्या डासाच्या अळ्या-नुकतेच अभिनेता शाहिद कपूर याच्या बंगलाच्या परिसरात साचलेल्या पाण्यात इडिस इजिप्ती डासाच्या अळ्या सापडल्याचे वृत्त असून मुंबई महानगरपालिकेने शाहिदला नोटिस दिली असल्याचे समजते. सप्टेंबर २०१५ मध्येही जुही चावला, अनिल कपूर, जितेंद्र आणि गायक अमित कुमार यांच्या बंगला परिसरातही ह्या डासांच्या अळ्या आढळल्या होत्या. त्यावेळीदेखील त्यांना महानगरपालिकेतर्फे नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. अशी घ्या काळजी औषधोपचारताप असेपर्यंत आराम करावा. ताप आल्यानंतर खूप वाट पाहू नये (४-५ दिवसांपेक्षा जास्त). त्यानंतर किंवा त्यापूर्वी पेशंटला डॉक्टरांकडे घेउन जावे. निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. (उदा. क्षार संजीवनी) रक्तस्राव किंवा शॉकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे.प्रतिबंधडासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला प्रसरण्यापासून थांबू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळ्च्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे या गोष्टी डासांना प्रतिबंध करू शकतात. संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते.औषधेया विषाणूवर प्रतिजैविके उपलब्ध नाहीत. तेव्हा गंभीर स्वरूपांच्या आजाराची वेळेत शहानिशा करून रुग्णाला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात.ravindra.more@lokmat.com