शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वाढतं वय लपवण्यासाठी पुरूष वापरू शकतात 'या' खास टिप्स, एकदा ट्राय करा मग बघा कमाल....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 11:02 AM

सध्या वेगवेगळ्या कारणांनी अनेकांना कमी वयातच वृद्ध दिसण्याची समस्या होऊ लागली आहे. बरं ही समस्या महिलांपेक्षा पुरूषांमध्ये अधिक बघायला मिळते.

सध्या वेगवेगळ्या कारणांनी अनेकांना कमी वयातच वृद्ध दिसण्याची समस्या होऊ लागली आहे. बरं ही समस्या महिलांपेक्षा पुरूषांमध्ये अधिक बघायला मिळते. याला वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यामुळे अनेकजण वेळेआधीच म्हातारे दिसतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही काही सोप्य टिप्स फॉलो करून तुमच्या त्वचेचं तारूण्य टिकवून ठेवू शकता. जाणून घेऊया त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी काही खास टिप्स...

सुर्यप्रकाशात जास्त वेळ राहू नका

त्वचेचं तारूण्य वाढविण्यासाठी किंवा वाढत्या वयातही तरूण दिसण्यासाठी आवश्यक आहे की, जेवढं शक्य असेल तेवढं सूर्याच्या प्रखर किरणांपासून दूर राहा. प्रखर सूर्यप्रकाशात सतत राहिल्याने त्वचेवर एज स्पॉट्स दिसून येतात आणि तुम्ही वयापेक्षा जास्त दिसून येता. परंतु, जर तुम्हाला कामामुळे उन्हामध्ये फिरावं लागत असेल तर सनस्क्रिन नक्की लावा. (Image Credit : https://www.themanual.com)

मॉयश्चरायझर ठरतं आवश्यक

ऑफिस किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाण्याची कितीही घाई असली तरिही तुम्ही मॉयश्चरायझर लावायला विसरू नका. मॉयश्चरायझर त्वचेचा कोरडेपणा दूर करून वाढत्या वयातही तुमच्या त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी मदत करतं.

जास्तीत जास्त पाणी प्या

वाढत्या वयातही तरूण दिसायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी प्या. तज्ज्ञांच्या मते, कमीत कमी 6 ते 8 ग्लास पाणी पिणं अत्यंत आवश्यक ठरतं. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.

धुम्रपान करणं टाळा

जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर आजपासूनच बंद करा. कारण धुम्रपान तुमच्या आरोग्यासोबतच तुमच्या त्वचेसाठीही घातक ठरतं. कारण धुम्रपान केल्यामुळे डोळे आणि तोंडाजवळ सुरकुत्या दिसू लागतात. तसेच स्किनवर रिंकल्सही दिसू लागतात.

झोप पूर्ण घ्या

अनेकदा कामाच्या प्रेशरमुळे पूर्ण झोप घेणं शक्य होत नाही. काही दिवांपूर्वीच करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, कमी झोप घेतल्याने फक्त आपल्या स्मरणशक्तीवर फरक पडत नाहीतर त्वचेचं तारूण्यही कमी होतं.

एक्सरसाइज आहे अत्यंत आवश्यक

जर तुम्ही कामाच्या व्यापामुळे स्वतःला वेळ देऊ शकत नसाल तर सकाळी किंवा संध्याकाळी कमीत कमी 10 मिनिटं तरी स्वतःसाठी द्या. यावेळेत एक्सरसाइज करा. यामुळे तुमच्या त्वचेसोबतच आरोग्यासाठीही अनेक फायदे होतील.

हेल्दी डाएट

त्वचेचं आरोग्य तुम्ही काय आहार घेता त्यावरही अवलंबू असतं. त्यामुळे आपल्या खाण्यामध्ये फ्रुट्स, फिस, हिरव्या पालेभाज्या आणि सलाड यांसारख्या हेल्दी पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुम्हाला त्वचेचं तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल.

ट्रेंड्स नाहीतर एजिंग स्टाइल करा मेन्टेन

लक्षात ठेवा, तुम्ही ट्रेन्डनुसार नाहीतर तुमच्या वयानुसार स्टाइल्स फॉलो करा. जर तुम्ही मिड-एज असाल तर अगदी कॉलेज गोइंग मुलांप्रमाणे ड्रेसिंग करू नका. आपली स्टाइल मेन्टेन करा. डिसेंट ड्रेसेसमुळे तुम्हाला डॅशिंग लूक कॅरी करायला मदत मिळेल.

बिअर्ड म्हणजेच दाढीची घ्या काळजी

आपण अनेकदा ऐकतो की, बिअर्डमुळे लूक आणखी क्लासी दिसतो. तुमच्या बिअर्डची स्टाइल तुमचं वय रिफ्लेक्ट करत असते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही एखादी नवीन स्टाइल कॅरी करणार असाल तर ती तुमच्यावर किती सुट करते हे नक्की लक्षात घ्या.

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स