अवघ्या ५४ हजारांची EV स्कूटर; सिंगल चार्जवर १३० km रेंज, जाणून घ्या फिचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 13:24 IST2025-07-23T13:23:30+5:302025-07-23T13:24:32+5:30
Zelio Gracy Plus: कमी बजेटमध्ये Electric Scooter पाहताय? हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो.

अवघ्या ५४ हजारांची EV स्कूटर; सिंगल चार्जवर १३० km रेंज, जाणून घ्या फिचर्स...
Zelio Gracy Plus: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच ऑटो कंपन्यांनी आता EV वाहनांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. काही कंपन्या अधिक रेंज ऑफर करतात, तर काही कमी रेंज. या स्कूटरची किंमतही त्यांच्या रेंजवर अवलंबून असते. अलीकडेच झेलिओ ई मोबिलिटीने कमी बजेटच्या ग्राहकांसाठी Zelio Gracy Plus नावाची एक नवीन EV स्कूटर लॉन्च केली आहे.
ही स्कूटर दोन बॅटरी पर्यायांसह येते. याचा ग्राउंड क्लीयरन्स १८५ मिमी असून, ही स्कूटर १५० किमी पर्यंत वजन उचलण्यास सक्षम आहेत. या स्कूटरची किंमत कमी असल्यामुळे, या खासकरुन विद्यार्थ्यांसाठी आणि डिलिव्हरी पार्टनर्ससाठी फायदेशीर ठरू शकतात.
२५ किमी प्रति तास वेगाने धावणाऱ्या या कमी स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ६०/७२ व्ही बीएलडीसी मोटर आहे. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एकदा चार्जसाठी सुमारे १.८ युनिट वीज वापरते. चार्जिंगच्या वेळेबद्दल बोलायचे झाले तर, या स्कूटरच्या लिथियम-आयन बॅटरी व्हेरिएंटला एका चार्जसाठी ४ तास लागतात.
झेलिओ ग्रेसी प्लसची किंमत ६५,००० रुपये (एक्स-शोरूम) आहे. हा व्हेरिएंट एका चार्जवर ११० किमी पर्यंतची रेंज देतो. याशिवाय, ७४V/३२AH व्हेरिएंटसाठी ६९,५०० रुपये खर्च करावे लागतील. हा व्हेरिएंट तुम्हाला एका चार्जवर १३० किमी पर्यंतची रेंज देईल.
याचे आणखी दोन व्हेरिएंट आहे, ज्याची किंमत ५४,००० रुपये (एक्स-शोरूम) आणि ६१,००० रुपये (एक्स-शोरूम) आहे. याची रेंज अनुक्रमे ८० किमी आणि १३० किमी पर्यंतची आहे. या किंमत श्रेणीत, ही स्कूटर ओला गिग (किंमत ४९,९९९ रुपयांपासून सुरू होते), कोमाकी एक्स वन प्राइम (किंमत ४९,९९९ रुपये) शी स्पर्धा करेल. कंपनी स्कूटरवर दोन वर्षांची, लिथियम आयन बॅटरीवर तीन वर्षांची वॉरंटी देत आहे. सध्या, कंपनीकडे देशभरात ४०० हून अधिक डीलरशिप (शोरूम) आहेत.