शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

इंधनाचे दर एवढे वाढतील की कल्पनाही केली नसेल; सौदी प्रिन्सचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 12:25 PM

सप्टेंबरच्या सुरुवातीला सौदीच्या सरकारी रिफायनरीवर ड्रोन, मिसाईलद्वारे हल्ला करण्यात आला होता.

रियाद : सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी साऱ्या जगाला गंभीर इशारा दिला आहे. यामुळे जर कच्च्या तेलाचे दर वाढले तर सर्वाधिक फटका हा भारताला बसणार आहे. देशातील पेट्रोल डिझेलचे दर वर्षातील उच्चांकावर आहेत. 

सप्टेंबरच्या सुरुवातीला सौदीच्या सरकारी रिफायनरीवर ड्रोन, मिसाईलद्वारे हल्ला करण्यात आला होता. यानंतर अमेरिकेने हा हल्ला ईरानने केल्याचा आरोप केला होता. तर या हल्ल्याची जबाबदारी येमेनच्या हुती विद्रोहींनी घेतली होती. तर सौदीनेही या हल्ल्यामागे ईरान असल्याचे म्हटले होते. सलमान यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर वक्तव्य केले आहे. 

ईरानमुळे कच्च्या तेलाचा पुरवठा बाधित होणार असून तेलाच्या किंमती एवढ्या वाढतील की या किंमती आम्ही आयुष्यात पाहिल्या नसतील, असा गंभीर इशारा सलमान यांनी दिला. यासाठी ईरान जबाबदार असणार आहे. या देशाविरोधात जगाने एकत्र आले पाहिजे, अन्यथा या किंमतींचा विचार करणेही कठीण जाईल, अशी धमकीच त्यांनी जगाला दिली आहे. सौदीच्या तेलाच्या रिफायनरींवर हल्ला करण्यात ईरानचा हात होता हे दाखविण्यासाठी सौदीमध्ये शस्त्रांचे एक प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये दावा करण्यात आला की, एवढी अद्ययावत हत्यारे हुती विद्रोही चालवू शकत नाहीत. मात्र, ईरान या हल्ल्यांमागे हात असल्याचे नाकारत आहे. 

अमेरिकी चॅनेल सीबीएसला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमान यांनी सांगितले की, सौदी अरेबियातील तेलाच्या रिफायनरीवर हल्ला ही ईरानकडून युद्धाची सुरूवात होती. यानंतरही आम्ही ईरान वादावर सैन्य नाही तर राजनैतिक तोडगा काढण्याचा विचार करत आहोत. कारण युद्धामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल. सलमान यांनी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईरानचे राष्ट्रपती हसन रुहानी यांना भेटून अणू कराराबाबत चर्चा करायला हवी. जेणेकरून ईरानच्या प्रभावाला मध्यपूर्वेतच रोखता येईल. यावेळी सलमान यांना पत्रकार जमाल खशोगी यांना मारण्याच्या आदेशाबाबतही विचारण्याच आले. यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. मात्र, त्यांनी खशोगी यांच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी घेत असल्याचेही सांगितले. कारण त्यांच्या हत्येमागे सौदी सरकारचेच काही लोक होते. ही एक चूकच होती आणि भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाAmericaअमेरिकाIranइराणFuel Hikeइंधन दरवाढ