Xiaomi ची इलेक्ट्रिक कार भारतात? बंगळुरूमधील इव्हेंटमध्ये शोकेस, 3 सेकंदात 100KM वेग, किंमत किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 05:12 PM2024-07-09T17:12:42+5:302024-07-09T17:13:11+5:30

Xiaomi SU7 : या कारचा सर्वाधिक वेग ताशी 265 किलोमीटर असा आहे. ही कार केवळ 3 सेंकदात 0 ते 100 किलोमीटरचा पल्ला गाठते. 

xiaomi unveils first electric car in india but not for sale check feature | Xiaomi ची इलेक्ट्रिक कार भारतात? बंगळुरूमधील इव्हेंटमध्ये शोकेस, 3 सेकंदात 100KM वेग, किंमत किती?

Xiaomi ची इलेक्ट्रिक कार भारतात? बंगळुरूमधील इव्हेंटमध्ये शोकेस, 3 सेकंदात 100KM वेग, किंमत किती?

बंगळुरु : भारतीय ऑटो मार्केटमध्ये नवीन कारची एन्ट्री होताना दिसून येत आहे. आता शिओमीने (Xiaomi) बहुचर्चित इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. मंगळवारी भारतात  Xiaomi च्या एका  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात या इलेक्ट्रिक कारची झलक दाखविण्यात आली.  Xiaomi SU7 असे या कारचे नाव आहे. या कारचा सर्वाधिक वेग ताशी 265 किलोमीटर असा आहे. ही कार केवळ 3 सेंकदात 0 ते 100 किलोमीटरचा पल्ला गाठते. 

मंगळवारी बंगळुरुमध्ये आयोजित या कार्यक्रमात कंपनीने Redmi 13 5G स्मार्टफोन लाँच केला. याशिवाय कंपनीकडून TWS आणि पॉवर बँक सुद्धा लाँच करण्यात आले. यानंतर कंपनीने Xiaomi SU7 या इलेक्ट्रिक कारची झलक दाखविली. ही कार कंपनीने भारतात अद्याप लाँच केलेली नाही. फक्त ती शोकेश केली आहे. लाँचिंगसंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

शाओमीच्या या इलेक्ट्रिक SUV मध्ये अनेक फीचर्स आहेत. यामध्ये सर्वात मोठे फीचर हे आहे की कार एकदा चार्ज केल्यावर 800 किलोमीटरपर्यंत धावते. इतकेच नाही तर 0-100 किलोमीटरचा वेग पकडण्यासाठी या कारला केवळ 2.78 सेकंदाचा वेळ लागतो. कारची पॉवर 673 पीएस इतकी आहे. तर या कारचा टॉर्क 838 Nm इतका आहे. Xiaomi SUV 7 एक फोर डोअर ईव्ही सेडान कार आहे. कारची लांबी 4997 mm, रुंदी 1963 mm आणि इंची 1455 mm इतकी आहे. या कारमध्ये सुरुवातीच्या व्हेरिएंटमध्ये 73.6 kwh ची बॅटरी तर टॉप व्हेरिएंटमध्ये 101kWh बॅटरी आहे. 

शाओमीच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये इंडिविज्युअल ड्राईव्ह मोड आहे. शाओमी स्मार्ट चेसिसवर तयार करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीने यामध्ये एकदम खास ब्रेकिंग सिस्टिम तयार केली आहे. या कारमध्ये 838NMचा किमान टॉर्क मिळतो. तर यामध्ये 673PS ची कमाल शक्ती मिळते. दरम्यान, चीनमध्ये या कारची किंमत 2,15,900 ते 2,99,900 युआन म्हणजे भारतीय चलनात 25,04,656 ते 33,39,600 रुपयांच्या दरम्यान आहे. या कारची लांबी 4997 मिमी, रुंदी 1,963 मिमी, उंची 1455 मिमी तर व्हीलबेस 3000 मिमी आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या व्हील साईजचा पर्याय देण्यात आला आहे. 

Web Title: xiaomi unveils first electric car in india but not for sale check feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.