शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 21:25 IST

या किंमत कपातीमुळे टाटा अल्ट्रोज बाजारातील, ह्युंदाई आय-२०, मारुती सुझुकी बलेनो आणि टोयोटा ग्लान्झा आदी प्रतिस्पर्धकांना थेट टक्कर देत आहे.

टाटा मोटर्सने फेस्टिव्ह सीझनपूर्वीच आपल्या ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे. कंपनीने आपल्या प्रीमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रोजच्या (Tata Altroz) किमतीत जबरदस्त कपात केली आहे. भारत सरकारने जीएसटी (GST) दर कमी केल्याने, कंपनीने या कपातीचा थेट फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने अल्ट्रोजच्या विविध मॉडेल्सच्या किमतीत मोठी घट झाली आहे. या किंमत कपातीमुळे टाटा अल्ट्रोज बाजारातील, ह्युंदाई आय-२०, मारुती सुझुकी बलेनो आणि टोयोटा ग्लान्झा आदी प्रतिस्पर्धकांना थेट टक्कर देत आहे.

व्हेरिएंटनुसार सूट -अल्ट्रोजच्या प्रत्येक व्हेरिएंटवर वेगवेगळी सूट देण्यात आली आहे. सर्वात कमी सूट म्हणजेच ₹५९,०००, ही सूट अल्ट्रोज स्मार्ट १.२ मॉडेलवर देण्यात आली आहे, तर सर्वाधिक ₹९८,००० ची सूट अल्ट्रोज अकॉम्प्लिश्ड+ एस डीसीए १.२ या टॉप-एंड व्हेरिएंटवर मिळत आहे.   

नवीन फीचर्स आणि डिझाइन -या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. यामुळे ही कार अधिक आकर्षक बनली आहे. नवीन डिझाइनमध्ये दिवसा चालू राहणारे लाइट्स (DRL), पूर्ण-LED स्प्लिट हेडलाइट्स, एक नवीन ग्रिल, नव्याने डिझाइन केलेला बंपर आणि १६-इंच ५-स्पोक अलॉय व्हील्सचा समावेश आहे.   

कारच्या आतील वैशिष्ट्ये - कारच्या कॅबिनमध्ये १०.२५-इंच ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो एसी कंट्रोल, इलेक्ट्रिक सनरूफ, क्रूझ कंट्रोल आणि ३६०-डिग्री कॅमेरा यांसारखी आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.   

सुरक्षिततेला सर्वोधिक प्राधान्य -टाटा अल्ट्रोज तिच्या मजबूत बांधणीसाठी आणि सुरक्षिततेसाठी ओळखली जाते. या कारला भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. किंमतीतील कपात आणि या उच्च सुरक्षा रेटिंगमुळे अल्ट्रोज खरेदीदारांसाठी एक अत्यंत आकर्षक पर्याय ठरू शकते.   

इंजिन पर्याय:अल्ट्रोज फेसलिफ्टमध्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणेच १.२-लीटर पेट्रोल, १.५-लीटर डिझेल आणि सीएनजी असे तीन पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहक त्यांच्या गरजेनुसार इंजिनची निवड करू शकतात.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनcarकार