शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय बाजारात धमाका करण्याच्या तयारीत टोयोटा! नवीन फॉर्च्युनरसह ४ दमदार SUV लाँच करणार; पाहा संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:41 IST

कंपनी आपल्या भारतातील पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. टोयोटा भारतीय बाजारात अनेक नवीन कार आणि एसयूव्ही लॉन्च करणार आहे. यांत नवीन फॉर्च्युनर, अर्बन क्रूझर एबेला आणि नवीन हायलक्स, यांचा समावेश आहे.

जगभरात विश्वासार्ह वाहनांसाठी प्रसिद्ध असलेली टोयोटा कंपनी आता भारतीय बाजारपेठेत नवा धमाका करण्याच्या तयारीत आहे. जर आपणही टोयोटाचे चाहते असाल आणि नवीन कार घेण्याच्या विचारात असाल, तर काही महिने थांबा. कंपनी आपल्या भारतातील पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. टोयोटा भारतीय बाजारात अनेक नवीन कार आणि एसयूव्ही लॉन्च करणार आहे. यांत नवीन फॉर्च्युनर, अर्बन क्रूझर एबेला आणि नवीन हायलक्स, यांचा समावेश आहे.

नवीन जनरेशन फॉर्च्युनर आणि इबेला -बहुप्रतीक्षित 'न्यू-जेन. फॉर्च्युनर'ची टेस्टिंग सुरू झाली असून, ही एसयूव्ही २०२६ अखेर अथवा २०२७ च्या सुरुवातीला लाँच होऊ शकते. या कारमध्ये १२.३ इंचाचे टचस्क्रीन, डिजिटल क्लस्टर आणि पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग आणि पूर्णपणे डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले यांसारखे हायटेक फीचर्स असतील. याशिवाय, 'अर्बन क्रूझर इबेला' ही पूर्णपणे इलेक्ट्रिक एसयूव्ही पुढच्या महिन्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. ६१ kWh बॅटरी पर्यायासह ही गाडी एका चार्जवर ५४३ किमीची रेंज देईल. या पूर्णपणे इलेक्ट्रिक एसयूव्हीमधील सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये लेव्हल २ एडीएएस सूट, ३६०-डिग्री कॅमेरा आणि सात एअरबॅग्जचा समावेश आहे.

न्यू-जेन. हायलक्स आणि हायराइडर -नोव्हेंबर २०२५ मध्ये जागतिक स्तरावर लाँच झालेली नवीन 'हायलक्स' आता भारतीय रस्त्यांवर उतरण्यासाठी सज्ज आहे. ही ICE आणि EV अशा दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध होईल. काही बाजारांमध्ये हिच्या ऑल-इलेक्ट्रिक मॉडलची विक्री आधीच सुरू झाली आहे. तर ICE इंजिनच्या व्हर्जनची डिलिव्हरी 2026 च्या मिडमध्ये सुरू होईल. इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये २४० किमीची रेंज मिळेल. 

टोयोटाची लोकप्रिय 'हायराइडर' आता ७-सीटरमध्ये?यासोबतच, टोयोटाची लोकप्रिय 'हायराइडर' आता ७-सीटरमध्येही येऊ शकते. नवीन डिझाइन आणि १७ इंचाच्या अलॉय व्हील्ससह ही ७-सीटर एसयूव्ही सप्टेंबर २०२६ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर लाँच होणे अपेक्षित आहे. यामध्ये १.५ लीटर हायब्रीड पेट्रोल इंजिन आणि ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टीमचा पर्यायही दिला जाऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Toyota Set to Launch Four Powerful SUVs in Indian Market

Web Summary : Toyota plans to launch new Fortuner, Urban Cruiser Taisor, Hilux, and a 7-seater Hyryder in India. The electric Urban Cruiser Taisor offers 543km range. New Hyryder may offer hybrid engine and AWD.
टॅग्स :ToyotaटोयोटाAutomobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर