देशातील टॉप-२५ कार; या SUV चा 'जलवा', ठरली नं.१; फेब्रुवारी महिन्यात तब्बल १९४३० युनिट्सची विक्री; दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:35 IST2026-03-06T12:34:19+5:302026-03-06T12:35:19+5:30
या यादीत ७००० हून अधिक युनिट्सच्या विक्रीसह टाटा टियागोचे शेवट्या स्थानावर राहिली...

देशातील टॉप-२५ कार; या SUV चा 'जलवा', ठरली नं.१; फेब्रुवारी महिन्यात तब्बल १९४३० युनिट्सची विक्री; दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर कोण?
भारतीय ऑटोमोबाईल बाजारासाठी फेब्रुवारी महिना अत्यंत लाभदायक ठरला. या महिन्यात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर कार खरेदी केल्या. एकूण विक्रीच्या आकडेवारीमध्ये 'टाटा नेक्सॉन'ने (Tata Nexon) प्रथम क्रमांक पटकावत आपला जलवा दाखवला. टाटा नेक्सॉनने फेब्रुवारी महिन्यात तब्बल १९,४३० युनिट्सची विक्री केली. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या (फेब्रुवारी २०२५) १५,३४९ युनिट्सच्या तुलनेत यंदा विक्रीमध्ये २७ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, या यादीत ७००० हून अधिक युनिट्सच्या विक्रीसह टाटा टियागोचे शेवट्या स्थानावर राहिली.
टाटा पंचची दमदार कामगिरी
विक्रीच्या या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी डिझायर असून, या कारने ३२ टक्के वार्षिक वाढीसह १९,३२६ युनिट्सची विक्री केली. तर तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा टाटा समूहाची 'टाटा पंच' राहिली. २९ टक्के वाढीसह या कारने १८,७४८ युनिट्सची विक्री नोंदवली आहे. तसेच, चौथ्या क्रमांकावर १० टक्के वाढीसह १७,९३८ युनिट्स विकणारी ह्युंदाई क्रेटा राहिली. याशिवाय, मारुती सुझुकी ब्रेझा १७,८६३ युनिट्स पाचव्या क्रमांकावर आहे.
बघा टॉप-25 कारची लिस्टि -
टाटा नेक्सॉन – १९,४३०
मारुती सुझुकी डिझायर – १९,३२६
टाटा पंच – १८,७४८
ह्युंदाई क्रेटा – १७,९३८
मारुती सुझुकी ब्रेझा – १७,८६३
मारुती सुझुकी अर्टिगा – १७,८०७
मारुती सुझुकी वॅगनआर – १४,८८५
मारुती सुझुकी स्विफ्ट – १४,८३३
महिंद्रा स्कॉर्पिओ – १४,६६५
मारुती सुझुकी बलेनो – १४,६३२
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स – १३,८९८
मारुती सुझुकी व्हिक्टोरीस – १३,०२१
मारुती सुझुकी इको – ११,६२०
महिंद्रा थार – ११,०४७
ह्युंदाई व्हेन्यू – १०,४९४
किया सेल्टोस – १०,३०८
महिंद्रा बोलेरो – ९,८६३
मारुती सुझुकी अल्टो – ९,७८७
किया सोनेट – ९,७५०
टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर – ९,३५९
महिंद्रा XUV 7XO – ९,११२
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस – ८,७०३
महिंद्रा XUV 3XO – ८,६३७
टाटा सिएरा – ७,१००
टाटा टियागो – ७,०४०